Share

पतीच्या समोरच पत्नीचे प्रियकरासोबत अश्लील चाळे; पतीने ‘हे’ भयानक कृत्य करत घेतला बदला

पती पत्नीच्या नात्याला कलंक लागणारी घटना घडली आहे. पत्नीने आपल्या जिवंत पतीसमोरच प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवले. या रागातून नशेत असणाऱ्या पतीने टोकाचे पाऊल उचलले. ऐकून तुम्हांला देखील धक्का बसेल. या घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.

संबंधित घटना ही तेलंगणातील हैदराबादमधील रचकोंडा येथे ही घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. तो 49 वर्षांचा आहे. त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यानं आपल्या पत्नीची आणि तिच्या प्रियकराची स्क्रू ड्रायव्हरने भोकसून हत्या केली आहे.

संबंधित महिलेचे अनेक दिवसांपासून यशवंत नावाच्या कारचालकासोबत प्रेमसंबंध होते. हे दोघं अनेकदा त्याला रंगेहाथ सापडले होते. परंतु अनेकदा सांगितल्यानंतरही त्याच्या पत्नीने हे प्रकरण थांबवलं नाही. पतीच्या मागे ती यशवंतला भेटू राहिली.

माहितीनुसार, महिला आणि तिचे कुटुंब विजयवाडा येथून हैदराबादला गेले होते. यातच पत्नी कारचालक यशवंतला भेटली आणि त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. जेव्हा तिच्या पतीला या प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा त्याने आक्षेप घेतला आणि पत्नीला यशवंतला सोडण्याची धमकी दिली.

त्यानंतर काही दिवसांनी पतीने तिच्या पत्नीला विजयवाडाला परत जाण्यास सांगितलं. मात्र यावेळी पत्नी विजयवाडा एकटी जाण्यास तयार नव्हती, तिचा प्रियकर तिच्या सोबत यावा अशी तिची इच्छा होती. हे समजल्यानंतर आरोपी पतीने दोघांना ठार मारण्याचा प्लॅन केला.

पतीने प्रियकराला सोबत येण्यास होकार दिला. यावेळी आरोपी पती, पत्नी आणि तिचा प्रियकर तिघेही विजयवाडा एकाच गाडीतून निघाले. कोथागुडेम शहरात पोहोचले. दरम्यान, पत्नी आणि यशवंत मध्ये प्रवासात देखील जवळीकता वाढली. ते पाहून आरोपी पती दारू पिऊ लागला. त्यानंतर त्याला संताप अनावर झाला आणि त्यानं यशवंतला दगड मारण्यास सुरुवात केली.

आरोपी पतीचा पारा चढला होता. दारूच्या नशेत त्याला काही सुचेना. त्यानं स्क्रू ड्रायव्हर घेतला आणि आपल्या पत्नीला तसेच तिच्या प्रियकराला भोकसवू लागला. दरम्यान, यामध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराने प्राण सोडले. त्यानंतर आरोपी पतीने दोघांचेही मृतदेह एका निर्जनस्थळी टाकून घटनास्थळावरून पळ काढला होता.

क्राईम

Join WhatsApp

Join Now