Share

ज्योतिष अभ्यासकांची देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत मोठी भविष्यवाणी; म्हणाले, ‘२०२३ नंतर सत्तेच्या जवळ…’

“२०२३ नंतर देवेंद्र फडणवीस यांची सत्तेच्या जवळ जाण्याची शक्यता निर्माण होईल. या काळात देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव वाढणार आहे”, अशी भविष्यवाणी ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी केली आहे. डॉ. नरेंद्र धारणे हे ज्योतिष अभ्यासक आहेत. यावेळी ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या बाबतीत देखील भविष्यवाणी केली आहे.(Astrologers make big predictions about Devendra Fadnavis)

“महाराष्ट्रातील प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांची रास सिंह आहे. तर शरद पवार यांची रास कन्या आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे”, अशी भविष्यवाणी ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी केली आहे. यावेळी ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी सरकारला देखील काही सल्ले दिले आहेत.

“निर्णय प्रलंबित ठेवल्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढेल. निर्णय प्रक्रिया लांबत असल्याने सरकारला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सरकारने लोकहिताचे निर्णय घ्यावेत”, असा सल्ला ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी दिला आहे. ८४ दिवसांमध्ये शेअर बाजार उच्चांक पातळी गाठेल, असा अंदाज ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी डॉ. नरेंद्र धारणे यांनी भारतामधील महागाईबाबत देखील अंदाज व्यक्त केला आहे. शनी, कुंभ, मकर आणि तूळ या राशींसाठी हा काळ उत्तम आहे. या काळात भारताची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच या काळात महागाई देखील कमी होण्याची शक्यता आहे. उद्योगधंद्यांच्या बाबतीत सकरात्मक घटना घडतील, असा अंदाज ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी व्यक्त केला आहे.

“२९ वर्षांनंतर शनी कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. २२ जुलै २०२२ पर्यंत शनी भ्रमण होणार आहे. भारत मकर राशीत येतो. त्यामुळे या काळात भारत जागतिक स्तरावर आर्थिक प्रबळ दावेदार बनेल, अशी भविष्यवाणी ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी केली आहे. कोरोना महामारीचा १३ जुलैपर्यंत भारतावर कोणताही परिणाम जाणवणार नाही, असे देखील डॉ. नरेंद्र धारणे यांनी सांगितले आहे.

आगामी काळात राज ठाकरेंचा प्रभाव वाढणार आहे. लोकांमध्ये त्यांची प्रतिमा वाढेल. राज ठाकरे यांच्यासाठी कुंभ राशीमधील शनी फायदेशीर ठरणार आहे, अशी भविष्यवाणी ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी केली आहे. ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांच्या भविष्यवाणीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. आता ही भविष्यवाणी खरी ठरेल की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


राजकारण तापलं! राज ठाकरेंच्या आधीच भाजप व हिंदूत्ववादी नेते संभाजीराजांच्या समाधीस्थळी हजर
…तर आपली मुले फक्त विमल गुटखाच विकतील, अभिनेते सौरभ शुक्ला यांचे मोठे वक्तव्य
शाहिद कपूरचा jersey फ्लॉप झाल्यानंतर राम गोपाल वर्मा म्हणाले, ‘साऊथचे रिमेक बनवायचे बंद करा’

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now