बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचे(Salman Khan) चाहते जगभर पसरलेले आहेत. अभिनेता सलमान खानचे चाहते त्याच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेता सलमान खानचे जवळपास सर्वच चित्रपट ईदला प्रदर्शित होतात. २००९ सालापासून चालत आलेली ही प्रक्रिया आता थांबणार आहे. कारण या वर्षी ईदच्या मुहूर्तावर अभिनेता अजय देवगणचा ‘रनवे 34’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.(salman khan this movie collect 900 corers on box office)
यापूर्वी २०१३ साली ईदच्या मुहूर्तावर रोहित शेट्टी आणि शाहरुख खानचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचे जेवढे चित्रपट ईदला प्रदर्शित झाले आहेत. त्या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. ईदला प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक व्यवसाय केला हे तुम्हाला माहिती आहे का? याची माहिती घेऊया.
२००९ साली बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा ‘वाँटेड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ईदला सलमान खानचा चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ होती. हा तो काळ होता जेव्हा सलमानची कारकीर्द फारशी चांगली जात नव्हती. त्याचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटत होते. यादरम्यान प्रभू देवाने दिग्दर्शित केलेला ‘वाँटेड’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ९३ कोटींची कमाई केली होती.
२०१० साली ईदच्या मुहूर्तावर बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा ‘दबंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने इन्स्पेक्टर चुलबुल पांडेची भूमिका साकारून आपल्या अॅक्शन कौशल्याबरोबरच विनोदी कौशल्याचीही जाणीव करून दिली होती. या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २१३ कोटींची कमाई केली होती.
२०१० साली बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करीना कपूरचा ‘बॉडीगार्ड’ हा चित्रपट ३१ ऑगस्ट २०११ रोजी ईदला रिलीज झाला होता. या चित्रपटाद्वारे सलमान खानने सुपरहिट चित्रपट देण्याची हॅटट्रिक केली होती. या चित्रपटातील अॅक्शन सीन्सना प्रेक्षकांनी खूप पसंत केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींची कमाई केली होती.
२०१२ मध्ये सलमानने त्याची कथित एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफसोबत ‘एक था टायगर’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले होते. या चित्रपटात तो एका RAW एजंटच्या भूमिकेत दिसला होता, जो जगभरात भारतासाठी गुप्त मोहिमा राबवतो. या चित्रपटाने जवळपास ३२०कोटींचा व्यवसाय केला होता. या चित्रपटाच्या सुपरहिटनंतर आज ‘टायगर’ ही सलमानची यशस्वी फ्रँचायझी बनली आहे. याचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
यानंतर २०१४ साली ‘किक’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने कमाईचा पूर्वीचा विक्रम मोडत एकूण ४०२ कोटींचा व्यवसाय केला होता. २०१५ साली ईदच्या दिवशी ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ९०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता.
महत्वाच्या बातम्या :-
भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेने मंदिराला दान केले लाखो रुपये, सोशल मीडियावर होतंय कौतुक
आमचे जीएसटीचे ३६ हजार कोटी द्या, सांगाल तो टॅक्स गायब करतो; ठाकरें पाठोपाठ राष्ट्रवादीही गरजली
अभिनेत्री दिपाली सय्यदच्या ‘त्या’ वक्तव्यामागे दहशतवादी संघटनेचा हात?