भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्थानकाबाहेर झालेल्या हल्ला प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह ३ जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.(Former Shiv Sena mayor and three corporators arrested in Somaiya attack case)
शनिवारी रात्री खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या खार पोलीस ठाण्यात गेले होते. भेट झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या खार पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. त्यावेळी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. तसेच दगडफेक देखील करण्यात आली होती.
या हल्ल्यात किरीट सोमय्यांच्या हनुवटीला दुखापत झाली होती. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी वांद्रे पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली होती. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी हे प्रकरण खार पोलीस ठाण्याकडे वर्ग केले होते. तसेच या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहसचिवांची भेट देखील घेतली होती.
यानंतर पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणात दिनेश कुबल, शेखर वायंगणकर आणि हाजी अलीम या शिवसेनेच्या तीन नगरसेवकांना देखील अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणात मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना जामीन मिळाला आहे. वैद्यकीय आधारावर विश्वनाथ महाडेश्वर यांना जामीन देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकार विरुद्ध किरीट सोमय्या असा वाद रंगला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
या प्रकरणात राज्य गुन्हे शाखेकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांची चौकशी देखील करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केला होता. पुणे महानगरपालिकेत किरीट सोमय्या आले होते. यावेळी काही शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना धक्काबुकी केली होती. यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.
महत्वाच्या बातम्या :-
अंपायरशी भांडण्यापुर्वी आपआपसात भांडले होते दिल्लीचे खेळाडू, अखेर समोर आले ‘ते’ सत्य
‘या’ व्यक्तीच्या पैशांनी झाले सोनिया गांधींवर उपचार? येस बँकेच्या सह-संस्थापकाचा धक्कादायक खुलासा
आता इरफान पठानने केला अमित मिश्रावर पलटवार, म्हणाला, मी प्रत्येक नागरिकाला त्याचे पालन करण्याचे..






