अमरावतीच्या खासदार नवनीत राणाNavneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिले होते. यावरून दोन गटांमध्ये सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणात राणा दाम्पत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील खार पोलिसांनी याप्रकरणात कारवाई करत राणा दाम्पत्याला अटक केली आहे. याप्रकरणी राणा दाम्पत्याला न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.(Navneet Rana’s complaint to Lok Sabha Speaker)
तुरुंगात मिळणाऱ्या वागणुकीवरून खासदार नवनीत राणा यांनी वकिलांमार्फत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. यावेळी नवनीत राणा यांनी पत्रामध्ये राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. खासदार नवनीत राणा यांनी पत्रामध्ये लिहिले आहे की, “मला २३ एप्रिल २०२२ रोजी मुंबईतील खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. मी संपूर्ण रात्र पोलीस ठाण्यात काढली.”
” मी पिण्यासाठी पाणी मागितले. पण मला रात्रभर पाणी दिले गेले नाही. उलट मला पाणी मागितल्यामुळे जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मी अनुसूचित जातीची आहे, यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्क देखील नाकारण्यात आला”, असे खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पात्रात म्हंटले आहे.
खासदार नवनीत राणा यांनी पत्रामध्ये पुढे लिहिले आहे की, “मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आमंत्रित केले होते. माझा हा उपक्रम मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नव्हता. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून आम्ही हनुमान चालिसा पठणाचा निर्णय मागे घेतला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार नसल्याचे देखील सांगितले.ण त्यानंतर देखील आम्हाला पोलिसांकडून घरात कैद करण्यात आले.”
“उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली. शिवसेनेने सार्वजनिक जानदेशाचा अपमान केला आहे. शिवसेना पूर्णपणे हिंदुत्वापासून विचलित झाल्याचे दिसत आहे. शिवसेनेत हिंदुत्वाची ज्योत पुन्हा पेटवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा पठण करणार होता. आमचा कोणत्याही प्रकारचा धार्मिक तणाव निर्माण करण्याचा हेतू नव्हता”, असे खासदार नवनीत राणा यांनी पत्रामध्ये लिहिले आहे.
या सर्व प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “नवनीत राणा यांना तुरुंगात अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे. नवनीत राणा यांना पिण्याचं पाणी देखील दिलं जात नाही. त्यांना वॉशरूमला देखील जाऊ दिलं नाही. हे अतिशय धक्कादायक आहे. लोकशाहीला काळिमा फासणारी ही घटना आहे”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘नवनीत राणांना तुरुंगात अतिशय हीन दर्जाची वागणूक, वॉशरूमलाही जाऊ देत नाहीत;’, फडणवीसांचा गौप्यस्फोट
VIDEO: IPL पाहताना रितेशने अशी पार पाडली पित्याची जबाबदारी; पाहून जेनेलिया म्हणाली, ‘वेल डन बाबा’
‘KGF’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता एकेकाळी होता यशचा बॉडीगार्ड, वाचा रंजक कथा