Share

७ वेळा पराभव होऊनही सचिन मुंबईच्या समर्थनार्थ उतरला मैदानात, म्हणाला, ते चुका करतील आणि..

आयपीएल (IPL) 2022 मध्ये, 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात खूपच खराब झाली आहे. पहिल्या 6 सामन्यात संघाचा पराभव झाला. कर्णधार रोहित शर्माला आतापर्यंत फलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी करता आलेली नाही. दुसरीकडे गोलंदाजांनाही विकेट घेता येत नाहीत. यंदाच्या मेगा लिलावामुळे संघातील अनेक प्रमुख खेळाडू दुसऱ्या संघात गेले आहेत. संघाच्या या कामगिरीवर मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.(Sachin came out in support of Mumbai)

सचिन तेंडुलकर म्हणतो की, मुंबईचा संघ तरुण आहे आणि ते त्यांच्या चुकांमधून शिकतील. सामन्यादरम्यान ब्रॉडकास्टर्सशी संवाद साधताना तो म्हणाला की, मुंबई इंडियन्स कठीण काळातून जात आहेत, यामध्ये आपण एकत्र राहून एक टीम म्हणून पुढे जावे. हा युवा संघ आहे, ते चुका करतील आणि त्याच्यातून शिकतील. गेल्या वर्षांतील कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सकडून सर्वांना मोठ्या अपेक्षा असल्याचेही सचिनचे मत आहे.

https://twitter.com/Sachinist/status/1517224443692879873?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1517224443692879873%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fipl-2022%2Fstory%2Fsachin-sachin-chants-during-ipl-match-in-dy-patil-stadium-sachin-tendulkar-interview-harsha-bhogle-csk-vs-mi-match-in-ipl-2022-tspo-1450793-2022-04-22

संघाच्या या कामगिरीवर सचिन म्हणतो की, हा फॉर्मेटच असा आहे आणि सर्व संघ अशा काळातून जातात. आपल्याला प्रथम हे समजून घ्यावे लागेल की या फॉरमॅटमध्ये असा कोणताही संघ नाही ज्याने याचा अनुभव घेतला नाही. जर सामन्यातील महत्त्वाचे क्षण तुमच्या बाजूने गेले नाहीत तर तुम्ही 2 किंवा 3 धावांनी किंवा शेवटच्या चेंडूवर हराल. मला आणखी एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, या कामगिरीनंतरही खेळाडू सरावात कठोर परिश्रम करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.

गेल्या सीजनमध्ये हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता, मात्र त्याआधी दोनदा विजेतेपद पटकावले होते. त्याआधी 2017, 2015 आणि 2013 मध्येही संघाने विजेतेपद पटकावले होते. या सीजनमध्ये संघाला प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण दिसत आहे.

मुंबईचा संघ मागील सामना गुरुवारी चेन्नई संघाविरुद्ध खेळला. यामध्ये नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघाने 7 बाद 155 धावा केल्या. टिळक वर्माने 43 चेंडूत 51 तर सूर्यकुमार यादवने 21 चेंडूत 32 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई संघानेही 7 विकेट गमावून 156 धावा केल्या आणि सामना 3 विकेटने जिंकला.

महत्वाच्या बातम्या-
अर्जुन तेंडुलकर करणार आयपीएलमध्ये धमाकेदार एन्ट्री? मुंबई इंडियन्सच्या त्या ट्विटनंतर चर्चांना उधाण
यंदा मुंबई इंडियन्स सर्वात कमकुवत टीम; रोहित शर्मावर हा दिग्गज खेळाडू नाराज, बुमराहवरही केलं भाष्य
मुंबई इंडियन्सच्या बेबी एबीची गर्लफ्रेंड आहे सोशल मिडीया सेंसेशन, दिसते खुपच सुंदर, पहा फोटो
मुंबई इंडियन्सचा ‘हा’ स्टार खेळाडूच मुंबईसाठी ठरला विलेन; होऊ शकते संघातून हकालपट्टी

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now