१७ वर्षात नाशिक शहरात भोंग्यांसाठी परवानगीच घेतली नाही, पोलीस आयुक्तांची धक्कादायक माहिती

गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलं आहे. मनसे पक्षाने मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला आहे. यादरम्यान नाशिकचे(Nashik) पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. नाशिक शहरात गेल्या १७ वर्षात मशिदींवरील भोंग्यांची परवानगीच घेतली गेलेली नाही, असे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले आहे.(Shocking information of the Commissioner of Police nashik district)

मशिदींवरील भोंग्यांबाबत बोलताना नाशिक जिल्ह्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी ही माहिती दिली आहे. ३ मे पर्यंत परवानगी घ्या, अन्यथा कारवाई करू, असा इशारा नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील कोणत्याही गुरुद्वारा, मशिदी आणि चर्च यांनी भोंगे लावण्यासाठी पोलीस आयुक्तालयातून परवानगी घेतलेली नाही.

२००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांबाबत आदेश दिले होते. पण याबाबतीत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेल्या माहितीमुळे नाशिक जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला होता.

यावेळी पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणाले की, “सध्याच्या परिस्थितीमध्ये जे लाऊडस्पीकर धार्मिक स्थळावर लावण्यात आले आहेत. त्यातील कोणीही परवानगी घेतलेली नाही. ३ मे पर्यंत त्यांना भोंग्यांची परवानगी घेण्याची मुदत देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि ग्रामपंचायतींना यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.”

“हा अहवाल तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि ग्रामपंचायतींना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे”, असे देखील नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कोणी या आदेशाचे पालन न केल्यास त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल.

“महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनी तीव्रतेबाबत काही बंधने घातली आहेत. शहरातील प्रत्येक ठिकाणी आवाजाची पातळी किती असावी, यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमावली तयार केली आहे. नाशिक शहरातील सर्व धार्मिक स्थळांना या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे”, अशी माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
३ मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे काढा, अन्यथा कारवाई करणार; नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा
कडवं हिंदुत्व म्हणत राज ठाकरेंच्या शनिवारच्या मांसाहारावरून मिटकरींचा टोला, म्हणाले, राजसाहेब..
राज ठाकरे अडचणीत, भोंगे उतरवण्याचा निर्णय न्यायालयाने दिलाच नाही, ‘ती’ माहिती निघाली खोटी