Share

‘नावातच जात शब्द असलेल्या सुजातकडून शहाणपणाची अपेक्षा नाही’, हिंदू महासंघाचा सुजात आंबेडकरांवर निशाणा

काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी उच्चवर्णीय उच्चवर्गीय ब्राम्हण लोक दंगल घडवतात आणि रस्त्यावर उतरणारी मुले ही बहुजन असतात, असं विधान केलं होत. यावेळी सुजात आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका देखील केली होती.

दंगल पेटवायची असेल तर स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरावा, स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून मनसे पक्षाने आणि हिंदू महासंघटनेने सुजात आंबेडकर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

“केवळ सुशिक्षित असून चालत नाही. सुजाण सुद्धा असावं लागतं”, असा टोला मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी सुजात आंबेडकर यांना लगावला आहे. हिंदू महासंघटनेने देखील सुजत आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. “नावातच जात शब्द असलेल्या सुजातकडून शहाणपणाची अपेक्षा नाही”, असा हल्लाबोल हिंदू महासंघटनेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे.

https://twitter.com/akhil1485/status/1513754475429007362?s=20&t=5YRjbqaZbrDhFjdwh89RdQ

प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांच्यावर टीका करताना मनसे नेते अखिल चित्रे यांनी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये अखिल चित्रे यांनी म्हंटल आहे की, “सुशिक्षित असून चालत नाही, सुजाण सुद्धा असावं लागतं. अर्थात, पुढारी बनणे हे अत्यंत जबाबदारीचे काम आहे. त्यासाठी तुम्ही फक्त उच्चशिक्षित असून चालत नाही. इतरही गुण आत्मसात करणे महत्वाचे.”

“पुरोगामी महाराष्ट्रात जातीभेद, उच्च-नीच मानणारे युवक आजही आहेत हे बघून मान खाली जाते”, अशी घणाघाती टीका मनसेच्या अखिल चित्रे यांनी केली आहे. हिंदू महासंघटनेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सुजात आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यावर मत व्यक्त केलं आहे. यावेळी हिंदू महासंघटनेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सुजात आंबेडकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

“नावातच जात शब्द असलेल्या सुजातकडून शहाणपणाची अपेक्षा नाही. दंगली ब्राम्हण घडवतात हे म्हणण्याआधी निदान वडिलांच तरी मत घ्यायचं होत. काल पर्वा रॅम नवमीला देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या आहेत. त्या कोणी केल्या? अफगाणिस्तानमधील बौद्ध प्रतिमेची तोडफोड कोणी केली? हिंदू धर्म रक्षण करण्यासाठी आज सुद्धा आमचा दलित बंधू काम करत आहे. हेच त्यांना सहन होत नाही. याच रागातून बोललं गेलं आहे”, असे हिंदू महासंघटनेचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
“धर्माने हिंदू असलेल्या राजसाहेबांनी हिंदुत्व हाती घेतले तर त्यात गैर काय?
बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट, पीडित तरुणीने चित्रा वाघांवरच केले गंभीर आरोप, म्हणाली…
सोमय्यांना सलग दुसरा दणका, मुलाचा जामीन अर्जही फेटाळला; दोघही पितापुत्रा गजाआड जाणार

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now