शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला होता. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक देखील केली होती. या हल्ल्यावेळी पोलीस उशिरा शरद पवार(Sharad Pawar) यांच्या घराजवळ पोहचले.(minister balasaheb thorat stataement on sharad pawar home attack)
या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या गृहमंत्रालयाला खडे बोल सुनावले आहेत. प्रसार माध्यमांचे कॅमेरे पोहचतात, पण आमचे पोलीस पोहचत नाहीत, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. यावेळी पोलीस यंत्रणेच्या कारभारावर देखील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, “शरद पवार देशातले मोठे नेते आहेत. कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. शासनापुढे अनेक अडचणी असतात.”
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, “एसटीचे विलीनीकरण शक्य नाही, हे सरकारने कायम सांगितले आहे. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर पेढे वाटण्यात आले. पण त्यानंतर घडलेली कालची घटना अत्यंत दुर्देवी आहे. एसटी कर्मचाऱ्यांबद्दल आम्हाला सहानभूती आहे. पण कुटुंबापर्यंत पोहचून दगडफेक करणे निषेधार्ह आहे.”
“अशा गोष्टींना प्रवृत्त करणाऱ्यांचा शोध घ्यायला हवा आणि त्यांच्यावर कारवाई करायला हवी”, अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी पोलीस यंत्रणेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. “गुप्त वार्ताहर हा प्रकार खूप महत्वाचा असतो. पवारांच्या घरावर हल्ला होताना तुमचे कॅमेरे पोहचतात. पण आमचे पोलीस पोलीस पोहचत नाहीत. तुमची यंत्रणा जास्त चांगली आहे”, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, “कोणत्याही संघटनेच्या आंदोलनाचे नेतृत्व महत्वाचे असते, दुर्देवाने एसटी कामगारांच्या आंदोलनाचे नेतृत्व कोण करतेय कळत नाही. आंदोलनाचे नेतृत्व करणारे लोक एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहेत”, असा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मुस्लिम नेताही म्हणाला, नवरात्रीत मांसबंदी पाहीजेच; लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात केलं स्वागत
आता शेतकऱ्यांनाही भरावा लागणार इन्कम टॅक्स, आयकर विभागाच्या रडारवर ‘हे’ शेतकरी; करणार मोठी कारवाई
पवारांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढल्यामुळेच सदावर्तेंना अटक – पत्नीचा गंभीर आरोप