प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) नुकतेच आई-बाबा झाले आहेत. भारतीने एका मुलाला जन्म दिला असून याबाबत तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी ही आनंदाची बातमी शेअर केली. त्यानंतर गुरुवारी भारतीला रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तर रूग्णालयातून बाहेर पडताना भारती तिचा पती हर्ष आणि मुलासोबत दिसून आली. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत भारती ब्रीच कँडी रूग्णालयाच्या बाहेर पती हर्ष आणि तिच्या लहान मुलासोबत पोझ देताना दिसून येत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, हर्षने मुलाला त्याच्या कवेत घेतला असून भारती त्याच्या बाजूला उभी आहे. तसेच यावेळी भारती आणि हर्षच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे.
यावेळी तिथे उपस्थित फोटोग्राफर्स भारतील शुभेच्छा देत आहेत. तसेच आम्ही काका, मामा झाल्याने खूप खूश आहोत, असेही भारतीला सांगत आहेत. या व्हिडिओत रूग्णालयातील इतर स्टाफसुद्धा दिसून येत आहेत. हा व्हिडिओ समोर येताच लोक पुन्हा एकदा भारती सिंहला शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान, भारतीने ३ एप्रिल रोजी बाळाला जन्म दिला होता. ही आनंदाची बातमी चाहत्यांना देण्यासाठी तिने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर प्रेग्नेन्सी फोटोशूटदरम्यानचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ती पती हर्ष लिंबाचियासोबत पोझ देताना दिसून आली. यासोबत या फोटोवर ‘It’s a Boy’ असे लिहित भारतीने त्यांना मुलगा झाल्याची माहिती दिली.
भारती तिच्या प्रेग्नेन्सीच्या काळातही तिच्या कामात खूप व्यग्र होती. ती डिलीव्हरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत चित्रीकरण करताना दिसून आली होती. भारतीने रविवारी मुलाला जन्म दिला. तर शनिवारी ती चित्रीकरणाच्या सेटवर दिसून आली होती. यावेळी तिच्यासोबत पती हर्षसुद्धा उपस्थित होता. यादरम्यानचे तिचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रत्येकजण तिचे कौतुक करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाने २०१७ साली लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर त्यांनी २०२० मध्ये एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, ते त्यांच्या पहिल्या बाळाची योजना करत आहेत. पण कोरोना महामारीमुळे त्यांनी हा निर्णय बदलला. लग्नाच्या पाच वर्षानंतर भारती आणि हर्षच्या घरी आता पाळणा हलला असून दोघेही यामुळे खूप खूश आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
Virajas Kulkarni : विराजस कुलकर्णीला पुण्यातील रस्त्यावर दिसलं होतं भूत; स्वतःच खुलासा करत म्हणाला,…
राजामौलींच्या RRR समोर ATTACK चा निघाला घाम, स्वत: जॉनने केलं कबूल, म्हणाला, आम्हाला जे हवे होते..
तीन दिवसात 1000 करोडच्या क्लबमध्ये सामिल होणार RRR, द काश्मिर फाईल्सलाही टाकणार मागे