औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर फिरायला गेलेल्या पत्नीने पतीची नजर चुकवत दागिन्यांसह पळ काढला आहे. या घटनेमुळे पतीच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. पतीने या प्रकरणात दौलताबाद (Daulatabaad) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.(aurangabaad married couple news )
मिळालेल्या माहितीनुसार, खुलताबाद तालुक्यातील राजेश प्रकाश लाटे हा तरुण विवाहासाठी वधू शोधत होता. राजेश औरंगाबाद मधील एका कंपनीत कामाला आहे. विवाहासाठी वधू शोधत असताना त्याची ओळख बबन म्हस्के नावाच्या व्यक्तीशी झाली. बबन म्हस्केने एक तरुणी लग्नासाठी तयार असल्याचे राजेशला सांगितले.
त्यानंतर बबन म्हस्केने राजेशची ओळख आशाबाई मोरे यांच्याशी केली. यानंतर राजेशचा विवाह जळगाव जिल्ह्यातील शुभांगीशी ठरवण्यात आला. या विवाहासाठी राजेशला शुभांगीच्या कुटूंबियांना एक लाख रुपये द्यावे लागले. यानंतर राजेश आणि शुभांगी यांचा विवाह दौलताबादमधील एका दत्तमंदिरात झाला. २६ मार्च २०२२ रोजी हा विवाह सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थित पार पडला.
लग्न झाल्यानंतर राजेश प्रकाश लाटे खूप आनंदी होता. त्याने पत्नीला ७० हजार रुपयांचे दागिने देखील केले होते. २९ मार्चला पूजा झाल्यानंतर राजेश आणि शुभांगी फिरण्यासाठी देवगिरी किल्ल्यावर गेले होते. यावेळी पत्नी शुभांगीने तुम्ही तिकिटे काढा, मी बाहेरून काहीतरी खायला आणते, असे पत्नीने सांगितले.
बराच वेळ झाला तरी पत्नी आली नाही म्हणून राजेशने आजूबाजूच्या परिसरात चौकशी करण्यास सुरवात केली. त्यावेळी एका दुकानदाराने ती एका बोलेरो गाडीत बसून गेली असल्याचे सांगितले. त्यानंतर राजेशने दौलताबाद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस सध्या शुभांगीचा शोध घेत आहेत.
या घटनेची चर्चा सध्या आसपासच्या परिसरात होत आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थामध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. लग्न झाल्यानंतर पती पत्नी देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी पत्नीने सासरचे दागिने आणि पैसे घेत मंदिरातून पळ काढला होता. या प्रकरणात पतीने पत्नीविरोधात तक्रारही दाखल केली होती.
महत्वाच्या बातम्या :-
VIDEO: लोकांना एप्रिल फुल करणं पडलं महागात; अंशुमनची पत्नी विनंती करत म्हणाली, ‘हे सगळं थांबवा’
शिक्षीकेने विद्यार्थ्यांसोबत ग्रुप सेक्स केल्यानंतर व्हिडीओ केला व्हायरल, विद्यार्थ्यांनी घेतली पोलिसांकडे धाव
काय सांगता? ‘तू तेव्हा तशी’मध्ये कपलची भूमिका साकारणारे शिल्पा आणि स्वप्निल ‘या’ मालिकेत होते मायलेक