नुकताच अभिनेत्री सई ताम्हणकरला ‘धुरळा’ या मराठी चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. यामुळे तिचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. यादरम्यान अभिनेत्री सई ताम्हणकर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या इंस्टाग्राम(Instagram) अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.(sai tamhnkar shear photo of life partner on instgram)
या पोस्टमुळे अभिनेत्री सई ताम्हणकर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरने लिहिले आहे की, “माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर तेज येते.” यासोबत तिने हॅशटॅग वन, साहेब, दौलतराव असे मेंशन केलं आहे.
https://www.instagram.com/p/Cb9Xvknsmeo/?utm_source=ig_embed&ig_rid=04726337-294b-4a04-90ff-61e2d50927b9
या पोस्टवर अभिनेत्री सई ताम्हणकरच्या चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एका युझरने कमेंट करत म्हंटले आहे की, “हा कोण आहे?” दुसऱ्या एका युझरने कमेंट करत म्हंटले आहे की, “हा तुझा लाइफ पार्टनर आहे का?”, अशी विचारणा केली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरच्या या पोस्टवर मराठी कलाकारांनी देखील कमेंट केली आहे.
मराठी अभिनेत्री प्रिया बापटने या पोस्टवर ‘अरे वाह’ अशी कमेंट केली आहे. तर काही कलाकारांनी या पोस्टला प्रतिक्रिया देताना हार्टचा ईमोजी शेअर केला आहे. त्यामुळे सईच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. २०१३ साली अभिनेत्री सई ताम्हणकरने अमेय गोसावीसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
त्यानंतर अभिनेत्री सई ताम्हणकरचं नाव वेगवेगळ्या व्यक्तींशी जोडलं जातं होतं. पण सईकडून या गोष्टीला अधिकृत दुजोरा मिळत नव्हता. आता इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या फोटोमुळे ती रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरने अनिश जोगचा फोटो शेअर केला आहे.
अनिशचा सिनेसृष्टीशी संबंध आहे. अनिश जोग मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता आहे. अनिश जोगने धुरळा, मुरांबा, वायझेड, डबल सीट आणि टाईम प्लिज या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच अनिशने काही वेबसिरीजची देखील निर्मिती केली आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा कधी करणार, याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
“राज ठाकरे किती दिवस आमच्या पोरांची डोकी भडकवणार, म्हणजे तुमची मुलं स्टडीत आणि आमची मुलं कस्टडीत?”
9 एप्रिलला राज ठाकरे पुन्हा गरजणार, आरोप करणाऱ्यांना ठाकरी भाषेत मिळणार सडेतोड उत्तरं
दुपारी ईडीची धाड अन् रात्री संजय राऊतांसह गडकरी शरद पवारांच्या भेटीला, राजकारणात नेमकं काय शिजतंय






