सोमवारी आयपीएलच्या चौथ्या सामन्यात गुजरात टायटन्स(Gujrat Titans) आणि लखनौ सुपर जायंट्स हे नवीन संघ पहिल्यांदा आमने-सामने भिडले. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने लखनौ सुपर जायंट्स संघाचा सहज पराभव केला. गुजरात टायटन्सच्या विजयात जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने मोलाची भूमिका बजावली.(American pornstar Fida watching Mohammed Shami’s performance)
या सामन्यात मोहम्मद शमीने लखनौ सुपर जायंट्सच्या तीन महत्वाच्या खेळाडूंना बाद केले. लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार के एल राहुलला जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने शून्यावर बाद केले. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला. त्यानंतर मोहम्मद शमीने डावखुरा फलंदाज क्विंटन डिकॉक आणि मनीष पांडे या दोन खेळाडूंना बाद केले.
या सामन्यानंतर गुजरात टायटन्स संघाच्या चाहत्यांनी मोहम्मद शमीचे कौतुक केले आहे. मोहम्मद शमीच्या या कामगिरीवर हॉलिवूड पॉर्नस्टार Kendra Lust फिदा झाली आहे. हॉलिवूड पॉर्नस्टार Kendra Lust ने यासंदर्भात ट्विट करत जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीचे कौतुक केले आहे. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\
Absolutely wonderful performance by @mdshami11 😍👏#LSGvsGT #IPL2022
— Kendra Lust® (@KendraLust) March 28, 2022
या ट्विटमध्ये Kendra Lust ने म्हंटलं आहे की, “खूप छान कामगिरी केलीस मोहम्मद शमी”, असा आशयाचे ट्विट हॉलिवूड पॉर्नस्टार Kendra Lust ने केले आहे. हॉलिवूड पॉर्नस्टार Kendra Lust हे ट्विट मोहम्मद शमीच्या चाहत्यांनी शेअर केलं आहे. मोहम्मद शमीला टॅग करत Kendra Lust ने या ट्विटमध्ये इमोजी टाकला आहे.
Kendra Lust चे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने प्रतिक्रिया देताना लिहिले आहे की, “भाई ती तुझ्या प्रेमात पडली आहे.” तर आणखी एका युजरने या ट्विटवर कमेंट करत म्हंटले आहे की, “तू पहिली अमेरिकन नागरिक आहेस जिला मी क्रिकेटबद्दल बोलताना पाहिलं आहे.”
Kendra Lust ही ४३ वर्षीय अमेरिकन पॉर्नस्टार आहे. Kendra Lust अमेरिकेत खूप प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त ती दिग्दर्शक देखील आहे. तिला बॉलीवूड चित्रपटांची आवड आहे. Kendra Lust ने यापूर्वी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान या सारख्या दिग्गज कलाकारांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
नवाजुद्दीन सिद्दीकीचा हटके अंदाज; लक्झरी कार सोडून केला लोकलने प्रवास, व्हिडिओ व्हायरल
घरात मोदींचा फोटो लावल्याने संतापला घरमालक, म्हणाला, फोटो काढून टाक नाहीतर..
सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने दिली पर्दाफाश करण्याची धमकी, ऐश्यर्या रायचा उल्लेख करत म्हणाली..