Share

हरणाला जिवंत गिळत असलेल्या अजगराला तरूणाने डिवचले, पुढे जे झाले ते पाहून थरकाप उडेल; पहा व्हिडीओ

अजगर हा अतिशय क्रूर प्राणी आहे. तो त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्यांनाही जिवंत गिळतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक अजगर एका हरणाला जिवंत गिळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हरणाला गिळत असताना तिथे असे काही घडले वाचून तुमचा थरकाप उडेल.

सध्या हरणाची शिकार करणाऱ्या या अजगराचा व्हिडीओ सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हरणाच्या अंगावर एका मोठया अजगराने विळखा घातला आहे. अजगराला हे हरण जिवंत गिळायचे होते. त्यासाठी त्याचा खटाटोप सुरू होता.

यादरम्यान, एका तरुणाची नजर अजगर आणि हरणावर पडली. या तरुणाने हरणाचा जीव वाचवण्याचा विचार केला. त्यासाठी त्याने झाडाची एक फांदी तोडून आणली. झाडाच्या या फांदीने तरुणाने अजगराला मारायला सुरुवात केली. तरुणाला अजगराच्या ताब्यात असलेल्या हरणाला सोडवायचे होते.

यावेळी अजगराला डिवचल्यामुळे अजगर चिडतो आणि तरुणाकडेच धाव घेतो. अजगर तरुणाच्या दिशेने धावत असताना अतिशय रागात दिसत आहे. तरीही तरुण अजगराला मारणं सुरूच ठेवतो. शेवटी अजगराला हरण सोडून पळून जावे लागते. मात्र, ज्या गतीने तो हरणाला सोडून पळतो, ते पाहून तुमचा थरकाप उडेल.

https://twitter.com/papakrab/status/1266582665982963714?t=cz0J0VmYSATJHisnr8xLXw&s=19

या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शेजारून जाणाऱ्या लोकांनी बनवला. यानंतर हा व्हिडिओ सोशल मिडीयावर टाकण्यात आला, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ थायलंडचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये, हरणाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना तरुण जी हिम्मत दाखवत आहे, ते पाहून अनेकजण चकीत झाले आहेत.

भुकेलेला अजगर हरणाला सहजासहजी सोडायला तयार नव्हता, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ थायलंडमधील दुसित प्राणीसंग्रहालयाच्या सहाय्यक संचालकाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. महाकाय अजगराने तरुणावर हल्ला केला असता तर, हा विचार करून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now