सध्या श्रीलंकेला मोठा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. श्रीलंकेमध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. श्रीलंकेमध्ये साखर(Sugar) २०० रुपये किलो, तांदूळ ५०० रुपये किलो, एक कप चहा १०० रुपये, पेट्रोल २५४ रुपये आणि डिझेल २१४ रुपये झाले आहे. त्यामुळे श्रीलंकेतील नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.(Sri Lanka is in a bad situation after falling into the trap of China)
काही वर्षांपूर्वी पैसा आणि संपत्तीने सदन असणाऱ्या या राष्ट्राला आता आर्थिक संकटाचा सामना का करावा लागत आहे? यामागे अनेक कारणे आहेत. त्यामधील एक कारण चीनकडून घेतलेले कर्ज आहे. खूप वर्षांपासून श्रीलंका आणि भारतात मैत्रीपूर्ण संबंध होते. पण गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकने भारताचा हाथ सोडत चीनसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले.
बेल्ट अँड रोड(Belt and rode) या प्रकल्पासाठी संमती मिळवण्यासाठी चीनने भारताच्या शेजारी असलेल्या राष्ट्रांना मोठ्या गुंतवणुकीची आणि कर्जाची भुरळ घातली. चीनने श्रीलंकेला मोठे कर्ज देऊ केले. तसेच श्रीलंकेमध्ये मोठी गुंतवणूक देखील केली. त्यामुळे जागतिक बँक किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनांकडून कर्ज न घेता श्रीलंकेने चीनकडून सुमारे पाच अब्ज डॉलर्सचे कर्ज घेतले.
पाकिस्तानने देखील चीनकडून कर्ज घेतले होते. या कर्जामुळे पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश आता आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या महिंदा राजपक्षे हे श्रीलंकेचे पंतप्रधान आहेत. श्रीलंकन सरकारने हंबनबोटा जिल्ह्यातील एक बंदर एक अब्ज वीस कोटी डॉलर्सच्या मोबदल्यात चीनकडे गहाण ठेवले आहे.
चीनकडून घेतलेले कर्ज फेडताना श्रीलंका देश दिवाळखोर झाला आहे. श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा एका वर्षापूर्वी पाच अब्ज डॉलर पेक्षा जास्त होता. आता तो एक अब्ज डॉलरवर आला आहे. एक डॉलरचे मूल्य सध्या २७५ श्रीलंकन रुपये झाले आहे. यामुळे श्रीलंकेमध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत.
या संकटात श्रीलंकेने पुन्हा एकदा चीनकडे आर्थिक मदत मागितली आहे. पण चीनने आर्थिक मदतीला नकार देत हात वर केले आहेत. श्रीलंकेमधील पर्यटन व्यवसाय देखील कोरोनाच्या महामारीमुळे डबघाईला आला आहे. रशिया युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक संघटनांचे श्रीलंकेमधील आर्थिक संकटावर दुर्लक्ष झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
“मी माझ्या कष्टाचा पैसा एका चोराला दिला, घर विकलेले पैसे या हरामखोराला दिले”
जेलमध्येही चमकला सुरज! खुनाच्या आरोपाखाली झाली अटक, अभ्यास करून क्रँक केली IIT परिक्षा
तुम्हाला वाटतय कश्मीर फाईल्स लोकांनी पहावा तर युट्यूबवर टाका, लोकांना फूकट पाहता येईल