शेअर बाजार(Shear Market) हा एखाद्या व्यवसायासारखा आहे. ज्या ठिकाणी योग्य शेअर ओळखण्यासोबतच त्यावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. सुरुवातीच्या दिवसांत चांगला परतावा न देणारा शेअर कालांतराने गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवतो. गुंतवणूक करा आणि विसरा, असा सल्ला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना दिला जातो.(this shear give huge profit to investor)
रशिया युक्रेन युद्धापासून शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ दिसून येत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे शेअर बाजारात चांगली वाढ दिसून आली आहे. यामुळे काही गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. GRM Overseas या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल ५.७१ लाख टक्क्यांचा परतावा दिला आहे.त्यामुळे शेअर बाजारात सध्या या शेअरची जोरदार चर्चा होत आहे. १ एप्रिल २००४ साली या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त १० पैसे होती. पण आता १७ मार्च २०२२ रोजी या शेअरची किंमत वाढून तब्बल ५७१ रुपयांवर पोहचली आहे.
GRM Overseas या कंपनीच्या शेअरने १८ वर्षांत गुंतवणूकदारांना ५.७१ लाख टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे. गुंतवणूक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, GRM Overseas या कंपनीच्या शेअरची गेल्या काही वर्षातील कामगिरी खूप चांगली आहे. १० वर्षांपूर्वी म्हणजेच २३ मार्च २०१२ रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत १.८५ रुपये होती.
आता या शेअरची किंमत ५७१.९५ रुपये झाली आहे. गेल्या १० वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना ३०,८१६ टक्के परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षात या कंपनीने ९,५४५ टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने १८ वर्षांपूर्वी या कंपनीत १० हजारांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज ती गुंतवणूक ५ कोटी ७२ लाख रुपये झाली असती.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने १८ वर्षांपूर्वी या कंपनीत एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज त्या गुंतवणूकदाराला ५८ कोटी रुपयांचा परतावा मिळाला असता. तसेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक हजारांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज ती गुंतवणूक ५७ लाख रुपये झाली असती.
महत्वाच्या बातम्या :-
दाम्पत्य विमानात चढलं आणि कोणीच नव्हतं, पुन्हा काऊंटरला जाऊन चौकशी करताच बसला धक्का
एका व्यक्तीवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा.., काश्मीर फाईल्सवर आमिर खानने सोडले मौन
‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ घेते ‘पवार सरकार”, शिवसेना खासदाराचा घरचा आहेर