‘पावनखिंड'(Pavankhind) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘पावनखिंड’ या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल १७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. अजून देखील या चित्रपटाचे शो हाऊसफुल जात आहेत. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाचे कौतुक होत आहे.(pavankhind film realse on amazone prime ott)
हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. यादरम्यान प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘पावनखिंड’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. २० मार्च रोजी हा चित्रपट अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
ओटीटीवर देखील ‘पावनखिंड’ या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळेल, असा अंदाज चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. अनेक कलाकारांनी व राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचे कौतुक केले होते. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने देखील पावनखिंड चित्रपटाचे कौतुक करताना एक ट्विट केलं होतं.
अभिनेता रितेश देशमुखने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “हे अविश्वसनीय आहे. पावनखिंडच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. थियटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांचे खूप खूप आभार.” बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखच्या या ट्विटवर लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. काही लोकांनी ‘पावनखिंड’ हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आणावा, अशी मागणी केली होती.
‘पावनखिंड’ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शन अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे. तर बाजीप्रभूंची भूमिका अभिनेते अजय पुरकर यांनी केली आहे. बाजीप्रभूंची भूमिका साकारण्यासाठी अभिनेते अजय पुरकर यांनी भरपूर मेहनत घेतली होती.
१८ फेब्रुवारी २०२२ रोजी चित्रपट ‘पावनखिंड’ हा प्रदर्शित झाला होता. पावनखिंड या चित्रपटानंतर दिग्पाल लांजेकर यांचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शेर शिवराज’ असं या नवीन चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
पवारसाहेब, ५५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत स्वत:च्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा
‘ही खोटी कथा आहे, त्यामुळे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला Tax Free करणार नाही’
इस्कॉन मंदिरावर हल्ला; २०० लोकांच्या जमावाकडून तोडफोड आणि लूटमार, अनेकजण जखमी