शेअर बाजार(Shear Market) हा एखाद्या व्यवसायासारखा आहे. ज्या ठिकाणी योग्य स्टॉक ओळखण्यासोबतच त्यावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे. सुरुवातीच्या दिवसांत चांगला परतावा न देणारे स्टॉक्स कालांतराने गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवतात. गुंतवणूक करा आणि विसरा, असा सल्ला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना दिला जातो.(this 12 rupees shear give huge profit )
काही स्टॉक्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. असाच एक स्टॉक बाळकृष्ण इंडस्ट्रीज या कंपनीचा आहे.या कंपनीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. कधीकाळी या कंपनीचा शेअर १२ रुपयांना विकला जात होता. पण आज या शेअरची किंमत २००० रुपयांवर गेली आहे.
गेल्या एका वर्षात या शेअरची किंमत १६४० रुपयांवरून २००० रुपये प्रति शेअर झाली आहे. एका वर्षाच्या कालावधीत या शेअरच्या किंमतीत २२ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. त्याचवेळी, गेल्या पाच वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत ७०० रुपयांवरून २००० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या पाच वर्षांच्या काळात या कंपनीच्या शेअर्समध्ये १८५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.
१३ मार्च २००९ रोजी शेअर बाजारामध्ये या कंपनीच्या एका शेअरची किंमत १२. १८ रुपये होती. १५ मार्च २०२२ रोजी या शेअरची किंमत २००० रुपये होती. गेल्या सहा महिन्यांत विक्री बंद झाल्यामुळे या कंपनीच्या शेअरच्या किमती २० % नी घसरल्या होत्या. एकेकाळी या शेतीची किंमत २३२७ रुपयांवर पोहचली होती. पण नंतर या शेअरची किंमत कमी-कमी होऊ लागली.
बाळकृष्ण इंडस्ट्रीज ही कंपनी टायर्सचे उत्पादन करते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी या कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज ती गुंतवणूक २.८५ लाख रुपये झाली असती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने दहा वर्षांपूर्वी या कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज ती गुंतवणूक १६ लाख रुपये झाली असती.
जात १३ वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीवर विश्वास दाखवला असता आणि एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर आज त्या गुंतवणूकदाराला १.६४ कोटी रुपये इतका मोठा परतावा मिळाला असता. शेअर बाजारात मोठा परतावा मिळविण्यासाठी तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कारण दीर्घकालीन गुंतवणूकीत तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो.
महत्वाच्या बातम्या :-
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला, खासदाराने केली मागणी
द काश्मिर फाईल्सनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन फिरणारे.., मोदींचा विरोधकांवर निशाणा
‘काश्मिर फाईल्स’ गंगुबाई काठियावाडीचा रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर, चौथ्या दिवशीही जबरदस्त कमाई