शेअर बाजारातील प्रत्येक शेअर चांगला परतावा देत नाही. काही शेअर खूप वर्षांनंतरही नकारात्मक परतावा देतात. त्यामुळे या शेअरमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते. पण असे अनेक शेअर्स असतात, ज्यामध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतात. असाच एक शेअर Jyoti Resins & Adhesives Ltd कंपनीचा आहे.(this company shear give 454900 percentage return)
या कंपनीच्या समभागांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा देऊन आश्चर्यचकित केले आहे. कंपनीच्या शेअरने जवळपास १८ वर्षांत ४,५४,९०० टक्क्यांहून अधिक परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. ३० एप्रिल २००४ रोजी BSE वर Jyoti Resins & Adhesives Ltd कंपनीच्या शेअर्सची किंमत प्रति शेअर ३६ पैसे इतकी होती. पण आता कंपनीच्या शेअर्सची किंमत १,६३८.५५ रुपये आहे.
या दीर्घ कालावधीत या समभागांनी आपल्या भागधारकांना ४,५४,९०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या दहा वर्षांत कंपनीचे शेअर्स ९.३२ रुपयांवरून १,६३८.५५ रुपयांपर्यंत वाढले आहेत. दहा वर्षांत या समभागाने सुमारे १७,४७५.११ टक्के इतका मोठा परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षात हा शेअर ६९ रुपयांवरून १,६३८.५५ रुपयांपर्यंत वाढला आहे.
या कालावधीत या शेअरने आपल्या भागधारकांना २२७३.९१ टक्के परतावा दिला आहे. एका वर्षापूर्वी १५ मार्च २०२१ रोजी या शेअरची किंमत BSE वर ४८०.१० रुपये होती. एका वर्षात या कंपनीच्या शेअर्समध्ये २४१.२९ टक्के इतकी वाढ झाली आहे. २०२२ या वर्षात हा शेअर ४६.३८ टक्क्यांनी वाढला आहे.
त्याच वेळी या महिन्यात कंपनीच्या समभागांमध्ये २०.१२ टक्के वाढ झाली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने १८ वर्षांपूर्वी या शेअरमध्ये १०,००० रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज त्या गुंतवणूकदाराला ४.५५ कोटी रुपये मिळाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने १० वर्षांपूर्वी या शेअरमध्ये १०,००० रुपये गुंतवले असते, तर आज ती रक्कम १७.५८ लाख रुपये झाली असती.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये १० हजार रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज त्या गुंतवणूकदाराला २.३७ लाख रुपये मिळाले असते. जर एखाद्या व्यक्तीने या शेअरमध्ये एका वर्षांपूर्वी १० हजार रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्या व्यक्तीला ३४.१२ हजार रुपये मिळाले असते.
महत्वाच्या बातम्या :-
‘पतीच्या रक्ताने माखलेला भात जबरदस्तीने पत्नीला खाऊ घातला’, काश्मिरी पंडितांचा किस्सा वाचून काळीज फाटेल
युपी निवडणूक सोडा, ‘या’ राज्याच्या निवडणूकीत भाजप-काँग्रेस दोन्ही पक्षांची अवस्था बिकट
प्रभासचा राधे श्याम चित्रपट पाहिल्यानंतर चाहत्याने घेतला गळफास, धक्कादायक कारण आले समोर