चेन्नई सुपर किंग्सने(CSK) आंतरराष्ट्रीय महिला दिन(Womens Day) असणाऱ्या ८ मार्च रोजी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघातील सर्व खेळाडूंच्या पत्नी दिसत आहेत. यामध्ये संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी देखील आहे. हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.(dhoni wife sakshi talk about him)
या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीने सांगितले की, “जेव्हा तुम्ही एका मोठ्या क्रिकेटपटूशी लग्न करता तेव्हा तुमच्यासमोर अनेक आव्हाने येतात. त्यांच्यानुसार स्वत:ला बदलावे लागते. क्रिकेटर्सची पत्नी झाल्यानंतर तुमचे वैयक्तिक आयुष्य काही उरत नाही.” या व्हिडिओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
साक्षीने पुढे म्हणाली की, “भारतात क्रिकेटची खूप क्रेझ आहे. त्यामुळे कोणत्याही एका खेळाडूसाठी अव्वल स्थानावर राहणे खूप आव्हानात्मक असते. मला माझ्या पतीचा अभिमान आहे. कारण त्याने भारतीय संघाकडून क्रिकेट खेळले आहे आणि त्याला भारतीय लोकांकडून खूप प्रेम मिळालं आहे.” या व्हिडिओमध्ये साक्षीने पती महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केलं आहे.
या व्हिडिओमध्ये साक्षीने क्रिकेटरच्या पत्नींना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, याबद्दल माहिती दिली आहे. साक्षीने व्हिडिओमध्ये सांगितले की, “प्रोफेशनल क्रिकेटरशी लग्न केल्यानंतर तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावा लागतो. तुमचा पती तणावातून जात असताना तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागेल.”
“लग्नानंतर प्रत्येकाचे आयुष्य बदलते. साधारणपणे तुमचं लग्न झालं की तुमचा नवरा ऑफिसला जातो. पण आमचे नवरे क्रिकेट खेळायला जातात. त्यामुळे मला वाटते की तुम्ही त्यांच्याशी जुळवून घेत त्यांच्या अपेक्षेनुसार बदल करून त्यांना तणावापासून दूर ठेवायला हवे”, असे साक्षीने व्हिडिओमध्ये सांगितले. ४ जुलै २०१० रोजी धोनी आणि साक्षीचे लग्न झाले होते.
लग्न होण्यापूर्वी धोनी आणि साक्षी दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. साक्षी अनेकवेळा धोनीसोबत टूरवर गेली आहे. भारतातील आणि आयपीएलमधील अनेक सामन्यांमध्ये साक्षी धोनीला प्रोत्साहन देताना देखील दिसली आहे. गेल्या वर्षी धोनी(Dhoni) कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्सने संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.
महत्वाच्या बातम्या :-
‘तारे जमीन पर’ फेम दर्शीललचा बदलला लुक, आता दिसतो खुपच हॅन्डसम, फोटो पाहून बसणार नाही विश्वास
महाविकास आघाडी सरकारचा पलटवार, फडणवीसांसह भाजपाच्या ‘या’ बड्या नेत्यांना अटक, राज्यात खळबळ
शारदाच्या किंचाळ्यांनी एका काश्मिरी पंडितला रात्रभर झोपू दिले नाही, काश्मिर फाईल्सचा असाही परिणाम






