Share

‘अजित पवारांच्या बोलण्याला काडीची देखील किंमत नाही, त्यांनी मोठेपणा थांबवावा’

Ajit-Pawar-

भाजपचे(Bjp) आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अजित पवारांच्या(Ajit Pawar) बोलण्याला सरकारमध्ये काडीचीही किंमत नाही. त्यांनी मोठेपणा थांबवावा, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांबाबत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.(gopichand padalkar statement on ajit pawar)

एसटी कर्मचाऱ्यांबाबत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, “मागच्या वेळीही उपमुख्यमंत्र्यांनी खोटेपणा केला आहे. ते एसटी महामंडळातील वाझे आहेत. एसटी संघटना पवार साहेबांची आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम सुरु आहे. न्यायालयाने मान्यताप्राप्त एसटी कर्मचाऱ्यांची नोंदणी रद्द केली आहे. पण अजित पवारांना खाजगी भरती करायची आहे.”

एसटी कर्मचाऱ्यांच्या विनाशाला अजित पवार कारणीभूत आहेत, असा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. “एसटी महामंडळात एक गोपनीयतेचं पत्र आहे. ते पत्र बाहेर न आल्यास माहिती कशी मिळणार? पत्र चुकीचं असल्यानं अधिकारीही उघडे पडले आहेत”, असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत

“संपात असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पण सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील काळेंना एसटी महामंडळात ठेवण्यात आलं आहे. माधव काळेची उचलबांगडी करा. तो पैसे वसूल करणारा एजंट आहे”, असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. यावर अजित पवारांकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी पुणे मेट्रोच्या उदघाटनावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. काम झालेलं नसतानाही पुणे मेट्रोचं उद्घाटन होत आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक पवित्र घेत शरद पवारांवर हल्लाबोल केला होता.

“शरद पवारांचे भाषण ऐकून मी अवाक् झालो. पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे किंबहुना शरद पवार हताशपणे बोलले असतील”, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. “पक्ष स्थापनेपासून गेल्या तीस वर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बसवता आला नाही”, असे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या :-
झुंड पाहून अनुराग कश्यप झाला भावूक; म्हणाला, अच्छा फिल्ममेकर नहीं, पागल भी और नीडर भी है नागराज
अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर सोनाक्षीने सोडले मौन; म्हणाली, तो माणूस केवळ प्रसिद्धीसाठी..
तुमच्याकडे कार असो वा बाईक, १ एप्रिलपासून या झटक्यासाठी राहा तयार, खिशावर येणार ताण

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now