झुंड चित्रपटाच्या प्रमोशनला अमिताभ बच्चन का दिसले नाहीत? चित्रपटाला होतंय नुकसान, चर्चांना उधाण

अभिनेता अमिताभ बच्चन(Amitabh Bacchan) यांची प्रमुख भूमिका आणि नागराज मंजुळे यांचे दिग्दर्शन असलेला ‘झुंड'(Zhund) हा चित्रपट काल देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून मोठी पसंती मिळत आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. काल पुण्यामध्ये नागराजने आणि त्याच्या टीमने हलगी वाजवत झुंड’ चित्रपटाचे प्रमोशन केलं होतं.(Why didn’t Amitabh Bachchan did not attend promotion event of zhund film)

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता आमिर खानसाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी आमिर खानची प्रतिक्रिया घेत चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आलं होतं. पण ‘झुंड’ चित्रपटामध्ये प्रमुख भुमिका असलेले दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन ह्या सगळ्या प्रमोशनल(Promotion) कार्यक्रमांमध्ये गैरहजर होते.

अमिताभ बच्चन यांनी ‘झुंड’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकही दिवस दिला नसल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे. ‘झुंड’ चित्रपटाच्या एकाही प्रमोशनल कार्यक्रमाला अभिनेते अमिताभ बच्चन उपस्थित नव्हते. जर सिनेमाचे हिरोच अमिताभ बच्चन असतील तर चित्रपटाला प्रमोशनची गरज काय? असे सोशल मीडियावर काही लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘झुंड’ चित्रपटाचे प्रमोशन फक्त त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी ‘झुंड’ चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलर संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केली आहे. याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून चित्रपटाच्या संदर्भातील काही पोस्ट शेअर केल्या आहेत.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी टेलिव्हिजनवर किंवा इतर माध्यमांवर ‘झुंड’ चित्रपटाचे प्रमोशन केलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या जात आहेत. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटाच्या यशाने दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांना यशाच्या शिखरावर नेले होते. या चित्रपटामुळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती.

‘झुंड’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केले असून विजय बारसे यांच्यावर जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. हा नागराज मंजुळेंचा पहिला हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट एक स्पोर्ट्स ड्रामा असून यात बिग बी फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
‘झुंड’ मुळे बदललं २० वर्षाच्या मुलाचं आयुष्य; मानले नागराज मंजुळे याचे आभार
दारूच्या नशेत गाडीला धडक मारलेल्या ‘त्या’ क्रिकेटरचा व्हिडीओ व्हायरल, अवस्था पाहून चाहतेही भावूक…
VIDEO: ‘भर जाते है जिंदगी में रंग कुदरत के’, धर्मेंद्र यांनी फार्महाऊसमधील रंगीबेरंगी फुलांची दिली माहिती