Share

ही आहे तिरंग्याची ताकद! भारतीय ध्वजामुळे युक्रेनमधून झाली विद्यार्थ्याची सुटका, वाचा थरारक किस्सा

Indian-student-Ukren

युक्रेनमध्ये(Ukren) सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या परदेशी नागरिक आणि विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहे.(indian student get rid from ukren)

भारत सरकारने देखील युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना देशात परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन गंगा'(Opreation Ganga) ही मोहीम राबविली आहे. ‘ऑपरेशन गंगा’ मार्फत आतापर्यंत सुमारे ८००० विद्यार्थ्यांना(Student) आणि नागरिकांना युक्रेनमधून भारतात आणण्यात आले आहे. यातील एका विद्यार्थ्याने आपला अनुभव सांगितला आहे.

“भारतीय ध्वजामुळे आम्हाला सहज मंजुरी मिळाली. आम्ही पडदा आणि कलर स्प्रे चा वापर करून ध्वज तयार केला होता. फक्त भारतीय विद्यार्थीच नाही तर पाकिस्तानी आणि टर्किश विद्यार्थ्यांना ही या ध्वजामुळे युक्रेनमधून बाहेर पडण्याची संधी मिळाली”, असे त्या विद्यार्थ्याने सांगितले. गेल्या सात दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये भयंकर युद्ध सुरु आहे.

या युद्धामुळे युक्रेनमधील परिस्थिती अधिकच भयावह होत चालली आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना तातडीने युक्रेनची राजधानी असलेले कीव शहर सोडण्यास सांगितले आहे.

https://twitter.com/ani_digital/status/1498886349063344128?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1498886349063344128%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.news18.com%2Fnews%2Fbuzz%2Findian-flag-helped-pakistani-turkish-students-flee-ukraine-amid-russian-invasion-4825763.html

सध्या अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारत सरकार या विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्यास प्रयत्न करत आहे. यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम राबविली आहे. गेल्या सहा दिवसांपासून या मोहिमेच्या अंतर्गत युक्रेनमधील भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात आले आहे.

रशियाकडून युक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहरावर हल्ला केला जाण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. अजूनही काही भारतीय विद्यार्थी युक्रेनमधील कीव शहरात अडकले आहेत. युद्धामुळे या विद्यार्थ्यांना अन्न आणि पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मोदी टार्गेट सांगणार अन् मिसाईल ते उध्वस्त करणार, युक्रेन हल्ल्याच्या तोंडावर पोखरणमध्ये होणार शक्तीप्रदर्शन
मोदींना युक्रेनमधील विद्यार्थ्यांचं काही पडलेलं नाही, राहुल गांधी आणि आम्ही.., शरद पवारांचे टीकास्त्र
दीपिकाने शेअर केले बेडरुम सिक्रेट; म्हणाली, “रणवीर नेहमी बेडवरच पडलेला असतो आणि…”

इतर

Join WhatsApp

Join Now