BharatPe चे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर(Ashnir Grover) यांनी कंपनीच्या संचालक मंडळावरील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिंगापूरमध्ये(Singapour) अशनीर ग्रोव्हर यांच्याविरुद्ध तपास सुरू करण्यासाठी फिनटेक प्लॅटफॉर्मवर दाखल करण्यात आलेल्या लवादात त्यांचा पराभव झाला आहे. यामुळे अशनीर ग्रोव्हर यांना मोठा धक्का बसला आहे.(bharat pay ashnir grover resign)
या पराभवानंतर अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. BharatPe चे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांनी फिनटेक युनिकॉर्न बोर्डला यासंदर्भात एक मेल पाठवला आहे. या मेलमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “मी अत्यंत दुःखी आहे. ज्या कंपनीचा मी संस्थापक आहे, आज त्याच कंपनीचा मला निरोप घेण्यास भाग पाडले जात आहे.”
याआधी अशनीर ग्रोव्हर यांच्या पत्नी आणि BharatPe कंपनीच्या ‘कंट्रोल्स’ विभागाच्या प्रमुख माधुरी जैन ग्रोव्हर यांना आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली बडतर्फ केलं होतं. फिनटेक प्लॅटफॉर्मवर अंतर्गत तपासणीत माधुरी जैन ग्रोव्हर यांनी निधीचा गैरवापर केल्याचे उघड झाले होते. यावर BharatPe चे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
BharatPe चे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर म्हणाले की, “आज ही कंपनी फिनटेकच्या जगातील सर्वोत्तम कंपनींपैकी एक आहे. २०२२ च्या सुरुवातीपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर काही लोकांकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. या लोकांनी फक्त मला नाही, तर कंपनीच्या प्रतिष्ठेला देखील हानी पोहचविली आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राकडून (SIAC) अशनीर ग्रोव्हर यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. या याचिकेवर २० फेब्रुवारीला पहिली सुनावणी झाली होती. मध्यस्थी केंद्राच्या आपत्कालीन लवादाने दोन दिवसांपूर्वी ग्रोव्हर यांच्या सर्व मागण्या नाकारून कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे. पण लवादाच्या या निर्णयाला ग्रोव्हर दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात.
अशनीर ग्रोव्हर यांनी फिनटेक स्टार्टअपमधील आपला हिस्सा विकण्यासाठी गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू केली आहे. अशनीर ग्रोव्हर यांची कंपनीत फिनटेक ९.५ टक्के हिस्सेदारी होती. मार्केटनुसार या हिस्स्याची किंमत १,९१५ कोटी रुपये आहे. अशनीर ग्रोव्हर यांनी IIT दिल्लीमधून बी-टेकची पदवी मिळवली आहे. तसेच त्यांनी IIM अहमदाबाद मधून MBA केले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मोदींचे भाषण सुरू असताना खुर्च्या झाल्या रिकाम्या, कार्यकर्ते गेले उठून, कारण विचारल्यावर म्हणाले..
‘डॉक्टर हरामखोर आणि आपटून मारायच्या लायकीचे आहेत’, संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
जबरदस्त! ‘या’ २ रुपयांच्या शेअरने दिला छप्परफाड परतावा, गुंतवणूकदार झाले करोडपती