Share

भाजपाला मतदान करणं महिलेला पडलं महागात, गुंडानी केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण

bjp-women

उत्तर प्रदेशमधून(Uttar Pradesh) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बांदा(Banda) जिल्ह्यातील एका महिलेने भाजपला(BJP) मतदान केलं होतं. यामुळे संतप्त झालेल्या काही गुंडानी त्या महिलेला बेदम मारहाण केली आहे. गुंडानी केलेल्या मारहाणीमुळे ती महिला बेशुद्ध होऊन पडली. महिलेच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी महिलेला बांदा जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.(uttar pradesh women beaten by criminals)

त्या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बांदा जिल्ह्यातील अछरौड गावातील आहे. गुंडानी मारहाण केलेल्या महिलेचे नाव मुन्नी देवी असं आहे, तर महिलेच्या पतीचे नाव अच्छेलाल असे आहे. दोघेही अछरौड गावचे रहिवाशी आहेत.

महिलेचा पती अच्छेलाल याने दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी मुन्नी देवी यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला मतदान केले होते. याचा राग आल्याने गावातील दबंग हिमांशू आणि लहान भावाने मुन्नी यांना मारहाण केली. यावेळी या गुंडांनी मुन्नी यांना शिवीगाळ देखील केली. यासोबतच बसपा पक्षाला मत का दिले नाही, अशी विचारणा त्या गुंडानी महिलेकडे केली.

यावेळी मुन्नी यांनी या गोष्टींबाबत नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यावर गुंडांनी मुन्नी यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत मुन्नी गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या लोकांनी या प्रकरणाची माहिती महिलेच्या कुटुंबियांना दिली आणि महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना मटौध पोलीस ठाण्याचे प्रभारी अरविंद सिंह गौर यांनी सांगितले की,अछरौड गावातील रहिवासी अच्छलाल याने संपूर्ण घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. सध्या प्राथमिक तपासात दारूच्या नशेत वाद झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

या घटनेत मारहाणीचे प्रकरण देखील समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सध्या पोलीस सखोल चौकशी करत आहेत. या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होतं आहे. या निवडणुकांमध्ये भाजप, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हे प्रमुख दावेदार आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
maruti suzuki ‘baleno’ चे असे पाच फिचर्स जे तुम्हाला कोणत्याच कारमध्ये पाहायला मिळणार नाही
आलिया भट्ट आहे तब्बल ‘एवढ्या’ कोटींची मालकीण, संपत्तीच्या बाबतीत मोठमोठ्या अभिनेत्रींनाही टाकते मागे
शेतकरी आंदोलन भडकले! संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यालय पेटवले, राज्य सरकारचे दुर्लक्ष

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now