इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या २०२१ च्या सिजनमध्ये सर्वाधिक धावा करणारा ऋतुराज गायकवाड श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. मनगटाच्या दुखापतीमुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या टी २० मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या सामन्यापूर्वी सरावाच्या वेळी त्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो सामना खेळू शकला नव्हता. (ruturaj gaikwad out form shrilanka series)
आता त्याच्या जागी मयंक अग्रवालचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्याने उजव्या हाताच्या मनगटात दुखत असल्याची तक्रार केली होती. यानंतर मेडीकल टीमच्या सूचनेवरून निवड समितीने मयंक अग्रवालला संघात स्थान दिले आहे. धर्मशाला येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी तो संघात सामील होणार आहे.
यापूर्वी केएल राहुल, अक्षर पटेल हे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडले होते, तर सूर्यकुमार यादव श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर होता. दुसरीकडे जडेजाने दुखापतीमुळे दीर्घकाळानंतर पुनरागमन केले आहे. पण दुखापतीमुळे टीम इंडियाचे अनेक महत्वाचे खेळाडू बाहेर आहेत.
ऋतुराजने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला ज्यामध्ये तो लवकर बाद झाला होता. या सामन्यात संघाचा कर्णधार रोहित शर्माने त्याला आणि ईशान किशनला सलामीला आणले होते. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातही तो खेळणार होता, मात्र दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. या संदर्भात कर्णधार रोहित म्हणाला होता की तो प्लेइंग इलेव्हनचा भाग झाला असता, पण दुर्दैवाने दुखापत झाली.
ऋतुराजचा सलामीवीर म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. मात्र त्याच्या अनुपस्थितीमुळे अनेक तरुणांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. दरम्यान, सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या इशान किशनने ५९ चेंडूत ८९ धावा केल्या.
तसेच श्रेयस अय्यरने नाबाद ५६ धावा केल्या. झारखंडच्या २३ वर्षीय इशानने कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी रचून भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. तर संजू सॅमसन आणि नवोदित दीपक हुडा यांना फलंदाजीची संधी मिळाली नाही.
महत्वाच्या बातम्या-
महेश भट्ट यांनी मुलगी पुजाबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ लज्जास्पद इच्छा, लिपलाॅक किस देखील केला होता
अशनीर ग्रोव्हर यांनी ‘Shark Tank India’ शो मधून किती कमाई केली? जाणून घ्या त्यांच्या संपत्तींबाबत
सनी देओलचे करिअर फ्लॉप करायला निघालेले महेश भट्ट स्वतःचे करोडोचे नुकसान करून बसले