राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकीय वातावरणात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेते संतापले आहेत. नवाब मलिक यांच्याविरोधात केंद्र सरकार सुडाचं राजकारण करत आहे, असा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केला आहे.(amol mitkari tweet on devendra fadanvis)
या प्रकरणावरून भाजप(BJP) नेत्यांनी नवाब मलिकांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण महाविकास आघाडी सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीवर अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
ईडीकडे ३ वर्षांपूर्वीच ऍक्सिस बँकप्रकरणाची तक्रार देण्यात आली होती. पण अद्याप दोघांपैकी एकालाही ईडीने चौकशीसाठी बोलावले नाही. ईडी नेमकी कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विचारला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारभारावर टीका केली आहे.
https://twitter.com/amolmitkari22/status/1496542622307205120?s=20&t=aK73YobQVnnke-kTd9mffw
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ” ४ सप्टेंबर २०१९ म्हणजे ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोहनिश जबलपुरे यांनी ॲक्सिस बँक नुकसानीचा सप्रमाण लेखाजोखा ED कडे सादर केला त्याचा हा पुरावा. या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ED ने बोलावले नाही. ED कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय?”
ईडीने बुधवारी दुपारी मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. सुमारे ८ तास चाललेल्या प्रदीर्घ चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली होती. त्यानंतर नवाब मलिकांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणात मंत्री नवाब मलिकांना ८ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे.
नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. “ईडीच्या अधिकाऱ्यांना आपल्या इशाऱ्यावर काम करायला लावायचं आणि नंतर त्यांना आमदारकी, खासदारकीचं तिकीट द्यायचं”, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी भाजप पक्षावर केला होता.
महत्वाच्या बातम्या :-
मोठा दिलासा! नवाब मलिकांच्या ‘या’ तीन मागण्या मान्य करत न्यायालयाने वाढवली ईडीची डोकेदुखी
…म्हणून मी RCB च्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला; विराट कोहलीने केला हैराण करणारा खुलासा
मराठी चित्रपटाचा साऊथमध्ये डंका! बाहुबली प्रभासने केले ‘सरसेनापती हंबीरराव’चे कौतुक, म्हणाला..