अनेकदा पती – पत्नीमध्ये वाद झाल्याच्या बातम्या आपण वाचत असतो. अनेकदा हे वाद एवढे विकोपाला जातात की पती – पत्नी एकमेकांपासून लांब होण्याचा निर्णय घेतात. अनेकदा माहेरच्या मंडळींच्या मदतीने मध्यस्थी करून वाद मिटवले जातात. मात्र पती-पत्नीच्या लैंगिक संबंधाबाबत कोणाला सांगता येत नाही. (husband not having sex with wife as she filled complaints against him)
मात्र या कारणावरून देखील पती – पत्नीमध्ये वाद होतात. अशाच एका पती-पत्नीच्या लैंगिक संबंधाबाबच्या घटनेची चर्चा सुरू आहे. लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास पतीने नकार दिल्याने महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे. तर जाणून घेऊ या नक्की प्रकरण काय?
ही घटना अहमदाबाद (Ahmedabad) घडली आहे. ‘मी गेल्यावर्षी बडोद्यातील एका व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. पण आतापर्यंत आमच्या शारीरिक संबंधच कायम झाले नाही. माझा पती रात्री अजब कपडे घालतो, ‘ असे महिलेने पोलिसात दिलेल्या आपल्या तक्रारीत सांगितलं आहे.
पुढे तिने तक्रारीत म्हंटले आहे की, मी जेव्हा त्याला शारीरिक संबंधाची मागणी करते तेव्हा तो म्हणतो की, मी तुझ्यासोबत संबंध ठेवू शकत नाही. या मुद्द्यावर मी जेव्हाही त्याच्यासोबत बोलते तेव्हा तो माझा गळा दाबतो आणि त्रास देतो.’ अखेर वैताकलेल्या पत्नीने तिचा शारीरिक संबंधाचा अधिकार मिळवण्यासाठी पोलिसांकडे गेली आहे.
दरम्यान, महिलेने पोलिस तक्रारीत सांगितले आहे की, ‘माझी आणि त्याची भेट एका मॅट्रिमोनिअल साइटवरून झाली होती. लग्न झाल्यावर सासरच्या लोकांनी मला एका वर्षातच मुलाला जन्म देण्याचा आदेश दिला. पण आतापर्यंत आमच्या शारीरिक संबंधच कायम झाले नाही.’
सध्या ही महिला आई-वडिलांसोबत साबरमतीमध्ये राहते. धक्कादायक बाब म्हणजे, आता तिला परत बोलवण्यासाठी ते लोक २५ लाख रूपये हुंडा मागत आहे. तसेच माझा पती मला नेहमीच आयव्हीएफच्या माध्यमातून बाळाला जन्म देण्याबाबत मागणी करत असल्याचे तिने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
‘’भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला…’’
१४ वर्षीय मुलीने लोखंडी तव्याने केली जन्मदात्या आईची हत्या; कारण ऐकून पोलीसही हादरले
श्रीमंतांच्या या टीप्स वापरल्या तर तुम्हीही व्हाल मालामाल, आजपासूनच अंमलात आणा
रिद्धिमान साहाला धमकावणारा तो पत्रकार कोण? साहाच्या त्या ट्विटनंतर पुन्हा चर्चांना उधाण