Share

चमत्कार! एचआयव्ही पॉझिटीव्ह महिलेने विषाणूवर केली मात, संशोधकांनाही बसेना विश्वास

‘एचआयव्ही’ झालेल्या व्यक्तीचा पूर्ण आजार बरा होण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा उपाय मिळाला नव्हता. यावर अनेक शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत, असे असतानाच ‘एचआयव्ही’ संदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शास्त्रज्ञानांच्या प्रयत्नाला यश आलेले चित्र आता समोर आलं आहे.

‘एचआयव्ही एड्स’ या रुग्णांसाठी असणारी ही दिलासादायक बाब म्हणजे, आता एचआयव्ही रुग्ण एड्स मुक्त होऊ शकतो. शास्त्रज्ञानांच्या संशोधनातून नुकतीच ही बाब समोर आली आहे. वैज्ञानिकांनी स्टेम सेल ट्रान्सप्लांट तंत्रज्ञानाद्वारे ही करामत केली आहे.

अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी एचआयव्हीचा तिसरा रुग्ण आणि पहिल्या महिलेवर या नव्या तंत्रज्ञानाने उपचार केले आहेत. या मार्फत एचआयव्हीपासून बरी होणारी जगातील ही पहिली महिला आहे. आता या नव्या तंत्रज्ञानामुळे एचआयव्ही रुग्णांच्या उपचारात मोठी मदत होणार असल्याचा दावा केला जात आहे.

माहितीनुसार, एचआयव्हीग्रस्त महिलेवर स्टेम सेल प्रत्यारोपणाद्वारे उपचार करण्यात आले. एचआयव्ही विषाणूंविरूद्ध नैसर्गिक प्रतिकार असलेल्या व्यक्तीने स्टेम पेशी दान केल्या होत्या. त्या पेशी या महिलेच्या शरीरात प्रत्यारोपण केल्या. त्यानंतर या महिलेची चाचणी करण्यात आली. ती चाचणी एचआव्ही निगेटिव्ह आली. उपचारानंतर गेल्या 14 महिन्यांपासून या महिलेची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, एचआयव्हीमुक्त होणारी ही जगातील पहिली महिला असून यापूर्वी दोन पुरूष एचआयव्हीमुक्त झाले आहेत. या रुग्णांना कर्करोगाच्या रोगप्रतिकारक पेशी नष्ट करण्यासाठी प्रथम केमोथेरपी केली जाते. त्यानंतर विशिष्ट अनुवांशिक   व्यक्तींकडून स्टेम पेशींचे प्रत्यारोपण केले जाते. त्यानंतर या व्यक्ती एचआयव्हीला प्रतिरोधक प्रतिकारशक्ती विकसित करतात,  अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

संबंधित महिलेला 2013 ला एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर चार वर्षांनी तिला रक्ताचा कर्करोग झाला. रक्ताच्या कर्करोवर हॅप्लो-कॉर्ड प्रत्यारोपणाद्वारे उपचार केले जातात. त्यानुसार तिच्यावर उपचार करण्यात आले. या महिलेचे 2017 मध्ये शेवटचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या 4 वर्षांत ती पूर्णपणे बरी झाली आहे. प्रत्यारोपणाच्या तीन वर्षानंतर, डॉक्टरांनी तिचे एचआयव्हीवरील उपचार देखील बंद केले असून, तिची प्रकृती चांगली आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now