Share

बदला घेण्यासाठी HIV पॉझिटिव्ह पतीने पत्नीसोबत केले धक्कादायक कृत्य, उचललं टोकाचं पाऊल

husband-wife-fight.j

बदला घेण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. काही वेळा माणूस बदला घेताना कौटुंबिक नात्याची देखील काळजी घेत नाही. सूडाच्या भावनेतून माणूस टोकाचं पाऊल उचलतो. असेच एक धक्कादायक प्रकरण कर्नाटकमधून(Karnataka) समोर आले आहे. एका व्यक्तीने पत्नीचा(Wife) बदला घेण्यासाठी असे पाऊल उचलले, जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल.(hiv positive husband shocking act to his wife)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्ती कॅब(Cab) चालक असून तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. २०१५ मध्ये त्याचा विवाह २८ वर्षीय पीडित महिलेशी झाला होता. आरोपीने आपल्या पत्नीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले असा आरोप आहे. आता कर्नाटक पोलीस त्या एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीचा शोध घेत आहेत.

त्याचवेळी पीडित महिलेने आपली एचआयव्ही चाचणी केली असून ती अहवालाची वाट पाहत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केले, कारण ती त्याच्यासोबत ब्रेकअप करणार होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे आरोपीच्या पत्नीला धक्का बसला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी एचआयव्ही बाधित असूनही पीडितेने त्याच्यासोबत राहण्यास होकार दिला होता. यादरम्यान दोघांनी एकमेकांशी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवले. यादरम्यान दोघेही जवळपास ६ वर्षे एकमेकांसोबत राहिले. त्याच वेळी, महिलेने तिलाही संसर्ग होऊ नये म्हणून तिची एचआयव्ही चाचणी करणे सुरू ठेवले.

पत्नीने साथ देऊनही आरोपीचे बाहेर अवैध संबंध सुरू होते. यादरम्यान आरोपी दुसऱ्या महिलेला घरी घेऊन आल्याचे त्याच्या पत्नीला समजले. हे समजल्यानंतर ती पतीपासून दूर झाली होती. यानंतर आरोपी कॅब ड्रायव्हरने पत्नीची भेट घेतली आणि निमित्त करून गेल्या आठवड्यात पत्नीला एका मित्राच्या घरी नेले.

मित्राच्या घरी आरोपीने पत्नीला अंमली पदार्थांचे सेवन करण्यास भाग पाडले आणि तिच्यासोबत असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले. यानंतर महिलेने बसवनगुडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांकडून पीडित महिलेचे समुपदेशन केले जात आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेला लग्नानंतर समजले की तिचा नवरा म्हणजेच आरोपी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. असे असतानाही आरोपी महिलेला आपल्यासोबत राहण्यासाठी तयार करण्यात यशस्वी ठरला. पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
किरीट सोमय्या वेडा माणूस, भाजपला भुताटकीनं झपाटलं; संजय राऊतांची खोचक टीका
अखेर ठरलं! सर्वात तरुण आमदार आणि महापौरांचं होणार लग्न, वाचा कशी जुळली रेशीमगाठ
माता सीताच्या जागी पत्नीचा आणि भगवान रामच्या जागी लावला स्वत:चा फोटो, BHU च्या प्रोसेसरचे वादग्रस्त कॅलेंडर

इतर

Join WhatsApp

Join Now