Share

डोनाल्ड ट्रम्प यांचा नाद नाय! सोबत फोटो काढायला २२ लाख आणि चहा प्यायला घेतात तब्बल ‘एवढे’ रुपये

Donald-trump.j

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. यावेळी ते त्यांच्या वक्तव्यामुळे नाही तर त्यांच्या कमाईमुळे चर्चेत आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यानंतरही वैयक्तिकरित्या लाखो डॉलर्स कमावत असल्याचे माहितीतून समोर आले आहे.(donal trump take 22 lakhs for photo)

मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांना त्यांच्यासोबत फोटो(Photo) काढण्यासाठी आणि एकत्र चहा(Tea) घेण्यासाठी हजारो डॉलर्स द्यावे लागत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चहा पिण्यासाठी त्यांच्या समर्थकांना ३७ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्याचबरोबर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत फोटो काढण्याची किंमत २२ लाख रुपये आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी निधी उभारणीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमातून मिळालेला पैसा थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या खात्यात जातो. या कार्यक्रमाचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाशी काहीही संबंध नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉफी टेबल बुकमधून गेल्या एका वर्षात ५०६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

पण वैयक्तिक कार्यक्रमांतून पैसा कमावण्याच्या शर्यतीत केवळ ट्रम्पच नाहीत, तर इतर माजी राष्ट्राध्यक्षांनीही अशा पद्धतीने पैसा कमावला आहे. यामध्ये बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्ल्यू बुश या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा देखील समावेश आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांनी या कार्यक्रमामधून ४८९ कोटी रुपये कमावले आहेत.

त्याच वेळी माजी राष्ट्राध्यक्ष बिल आणि हिलरी क्लिंटन भाषणांमधून पैसे कमवतात. जॉर्ज बुश यांनाही त्यांच्या भाषणांमधून पैसे मिळतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे कमाईचे एवढेच साधन आहे असे नाही. राष्ट्रपती होण्यापूर्वीच ते एक यशस्वी व्यापारी आणि खूप श्रीमंत व्यक्ती आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना या कार्यक्रमातून मिळालेली रक्कम त्यांच्या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईसमोर काहीच नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचे हॉटेल, रिअल इस्टेट, फायनान्स यांसह अनेक व्यवसाय आहेत. हे व्यवसाय देश-विदेशात पसरलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना वादांचा मोठा इतिहास आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृत कागदपत्रे फाडून टॉयलेटमध्ये फ्लश केल्याचा आरोप करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या :-
‘मनी हाईस्ट’ पाहून अपहरण करायचा ऑटोचालक, पोलिसांनी केली अटक
इतक्या भीषण अपघातातून कसंकाय वाचली अभिनेता दीप सिद्धूची गर्लफ्रेंड? वाचा थरारक अनुभव
‘संजय राऊत दरवर्षी माझ्या घरी येतात’, ‘तो’ फोटो शेअर करत मोहित कंबोज यांनी राऊतांना पाडले तोंडघशी

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now