उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh) उन्नाव जिल्ह्यातुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गंगाघाट कोतवाली भागातील आझाद नगर परिसरात रात्री उशिरा दोन चोरट्यांनी(Thief) एका घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून रोख रक्कम व दागिन्यांसह लाखोंचा ऐवज गोळा केला. चोर पळून जाण्याच्या तयारीत असतानाच घरातील लोक जागे झाले.(horrible The thief was caught into the house and given an electric shock)
घरातील लोक जागे झाल्याची चाहूल लागताच चोरटे पळू लागले. यावर घरातील लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरवात केली. या आवाजामुळे शेजारचे लोक देखील उठले. त्या लोकांनी धाव घेत एका चोरट्याला पकडले. तर दुसरा चोरटा रोकड आणि दागिने घेऊन पसार झाला. लोकांनी चोरट्याला पकडून एका खोलीत कोंडून बेदम मारहाण केली.
यानंतर त्या चोराला विजेचे झटके देण्यात आले. यानंतर लोकांनी चोरीची माहिती गंगाघाट पोलिसांना दिली. पोलिसांनी माहिती मिळताच चोरट्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. चोरट्यांनी घरात ठेवलेल्या पेटीचे व कपाटाचे कुलूप तोडून त्यात ठेवलेली रोख रक्कम व दागिने चोरून नेल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोक चोराला मारहाण करताना दिसत आहेत. तसेच लोक या चोराला विजेचा शॉक देताना देखील दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोराचे नाव शकील आहे. शकीलसोबत चोरी करणारा रईसुद्दीन घटनास्थळावरून फरार झाला आहे.
या प्रकरणाचा तपास सध्या उन्नाव पोलीस ठाण्याचे प्रमुख शशी शेखर सिंह करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोलीत बंद असलेल्या आरोपीची लोकांपासून सुटका करण्यात आली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आरोपीला गंगाघाट कोतवाली येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चोरासोबतच त्याला मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वी सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणी एका चोराला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मिरज येथे एका महिलेच्या गळ्यातील सोनं हिसकावण्याचा प्रयत्न चोरट्याने केला होता.
महत्वाच्या बातम्या :-
फक्त ५० रुपयांसाठी राखी सावंत करायची ‘हे’ काम, तिची स्ट्रगल स्टोरी वाचून तुम्हीही व्हाल भावूक
PHOTO: प्रियांका चोप्राने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, सासरच्या पार्टीला घातला इतका छोटा ड्रेस
बिग बॉसच्या विनरने बाथरूममध्ये जाऊन केल्या बोल्डनेसच्या सीमा पार; व्हिडीओमध्ये दिसली किलर स्टाईल