मुंबईतील(Mumbai) १०० कोटी वसुली प्रकरणात सचिन वाझेंनी(Sachin Vaze) माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्याविरोधात मोठी खेळी केली आहे. सचिन वाझेंनी मनी लाँड्रिंग प्रकरणात माफीचा साक्षीदार बनवण्याची ईडीकडे मागणी केली आहे. यासाठी पोलीस कोठडीत असणाऱ्या सचिन वाझेंनी थेट ईडीला यासंदर्भातील प्रस्ताव दिला आहे.(sachin vaze give letter to ED aganist anil deshmukh)
एप्रिल २०२० मध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सूचनेवरून तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी अर्ज केला होता, असे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हंटले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशावरून मुंबईतील बार मालकांकडून पैसे वसूल करण्यात येत होते, असे सचिन वाझेंनी चांदीवाल समितीला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे.
पोलिसांनी वांद्रे येथून प्रतिबंधित एन-९५ मास्कचा साथ जप्त केला होता. त्या कारवाईमध्ये माझी मोठी भूमिका होती. मी निलंबित असतानाही मी काम केले आहे,असा दावा सचिन वाझेंनी ईडीसमोर केला आहे. मी निलंबित असतानाही माझ्या कामगिरीवर ते आनंदी होते. त्यामुळे अनिल देशमुख यांनी माझे निलंबन रद्द करण्यात येईल, असे म्हणत मला तसा अर्ज परमबीर सिंह यांना देण्यास सांगितले.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यांनी दिलेल्या सूचनेचे मी पालन केले आणि ते रेकॉर्डवर आहे, असा जबाब निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी ११ डिसेंबरला ईडीला दिला होता. पैशांच्या अफरातफरी, वसुली प्रकरणी मला माफीचा साक्षीदार बनविण्यात यावे, अशी मागणी सचिन वाझेंनी पत्राद्वारे केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा खुलासा निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी केला आहे. सचिन वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख काल चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. यावेळी अनिल देशमुख यांनी जामिनासाठी अर्ज देखील केला होता.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. सचिन वाझेंना सेवेत रुजू करून घेण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्याकडून ताशा थेट सूचना आल्या होत्या, असे सिंह ईडीला दिलेल्या जबाबात म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
मोदींबद्दल केलेल्या ‘त्या’ मस्करीमुळे अक्षय कुमार आहे कपिल शर्मावर नाराज, खरे कारण आले समोर
महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मैत्रीचा हा किस्सा ऐकून तुम्ही व्हाल भावूक
मुस्लिम महिला म्हणाल्या, जय श्रीराम, तर हिंदू महिला म्हणाल्या, अल्लाहूँ अकबर; मुंब्र्यात दिसले एकात्मतेचे दर्शन