बीड(Beed) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी स्वतःला पेटवून घेत आत्मदहन केलं होत. यामध्ये त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. शेतकऱ्याने बीडच्या लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन केलं होतं. यांनतर देखील प्रशासनाला जाग आली नाही, म्हणून शेतकऱ्याच्या विधवा पत्नीने स्मशानभूमीतच आंदोलन केले आहे.(widow wife movement against pwd department in beed)
ज्या ठिकाणी शेतकऱ्याचा अंत्यविधी पार पडला. त्या स्मशानभूमीत शेतकऱ्याची पत्नी कडाक्याच्या थंडीत दहा दिवसांपासून आंदोलन करत आहे. यावर नागरिकांनी त्या विधवा पत्नीला न्याय न मिळाल्यामुळे प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकारावर आवाज उठवत प्रशासनाची प्रतीकात्मक तिरडी काढून आंदोलन केले आहे.
प्रशासनाकडून न्याय मिळावा याकरीता आत्मदहन केलेल्या शेतकऱ्याची पत्नी गेल्या दहा दिवसांपासून स्मशानभूमीत आंदोलन करत आहे. तरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत, असा संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाकडून जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी आमच्या कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला, असे त्या शेतकऱ्याच्या पत्नीने सांगितले.
माझ्या सासूने थेट मंत्रालयापर्यंत जाऊन निवेदन दिले, पत्रव्यवहार केला, तरी देखील आम्हाला जमिनीचा मोबदला मिळाला नाही. यातच माझ्या सासूचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या पतीने शासन दरबारी पाठपुरावा केला, मात्र त्यांना देखील न्याय मिळाला नाही. म्हणून शेवटी माझ्या पतीने स्वतःला पेटवून घेतले, असे त्या शेतकऱ्याच्या पत्नीने सांगितले.
माझ्या पतीचा मृत्यू झाला, तरीही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. प्रशासनाने फक्त गुन्हा दाखल केला. पण लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोठीही कारवाई झाली नाही. आम्हाला जमिनीचा मोबदला पण मिळाला नाही. एका तरी मोबदला द्या अन्यथा मुख्यमंत्री साहेब आत्मदहनास परवानगी द्या, असा इशारा त्या शेतकऱ्याच्या पत्नी तारामती साळुंखे यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यातील पाली गावात राहणाऱ्या तारामती साळुंखे गेल्या दहा दिवसांपासून स्मशानभूमीत प्रशासनाविरोधात आंदोलन करत आहेत. तारामती यांच्या पतीने अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाला कंटाळून बीडच्या लघु पाटबंधारे विभागातच आत्मदहन केले. यातच त्यांचा मृत्यू झाला. ‘या महिलेला न्याय द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू’, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
शास्त्रज्ञांनी शोधला पृथ्वीच्या भोवती फिरणारा ट्रोजन लघुग्रह, वाचा त्याच्याबद्दल आश्चर्यकारक गोष्टी
जया बच्चन यांनाही झाला कोरोना; धर्मेंद्रसोबतच्या ‘या’ चित्रपटाचे शूटिंग थांबवले…
पुण्यात भीषण अपघात; बांधकाम सुरु असताना मजूरांवर कोसळला लोखंडी स्लॅब, ५ मजूर ठार