Share

नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या बसचा आणि ट्रकचा भीषण अपघात, २० ते २२ विद्यार्थी गंभीर जखमी

Nashik-bus-truck-accident-

नाशिकमध्ये आज मोठा भीषण अपघात झाला आहे. नाशिक(Nashik) जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील धामणगाव जवळ बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे. नाशिक- औरंगाबाद रोडवर हा अपघात झाला आहे. या बसमधून महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रवास करत होते. या अपघातात २० ते २२ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.(Nashik bus truck big accident )

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक- औरंगाबाद रोडवर मेडिकल कॉलेजच्या स्टाफ बसला अपघात झाला आहे. या बसमध्ये मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी व कर्मचारी होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी सात वाजता महाविद्यालयाची बस धामणगावाकडे जात असताना सिग्नलवर बस आणि ट्रक या वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली.

त्यामुळे महाविद्यालयाची बस रस्त्यावरचं उलटली. बस उलटल्यानंतर गाडीमधील सामानही इतर ठिकाणी विखुरलं. या अपघातात बसचा चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या अपघातात बसमधील २० ते २२ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जखमींमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात झाल्यानंतर ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या ट्रकच्या चालकाचा शोध घेत आहेत.

महाविद्यालयाचे विद्यार्थी बसमधून प्रवास करत होते. धामणगाव जवळ असणाऱ्या सिग्नलवर भरधाव ट्रक आणि बसमध्ये समोरासमोर धडक झाली. ही धडक झाल्यानंतर बस रस्त्यावरच उलटली. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या अपघातात बसमधील विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे. हा अपघात झाल्यानंतर स्थानिक लोक त्या ठिकाणी जमा झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले आणि उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर ट्रकचा चालक मात्र फरार झाला आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
२७ वर्षीय पोलीस शिपायाचा व्यायाम करताना मृत्यु, चालता चालता छातीत कळ आली अन्…
सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बंडातात्यांच्या मठात पोलीस; केली मोठी कारवाई
बंडातात्या किर्तनकार आहे की नाही हाच प्रश्न; सुप्रियाताईंना दारूडी म्हटल्यामुळे राष्ट्रवादी संतापली

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now