पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांचे विश्वासू माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू(Suresh Prabhu) यांनी राजकारणामधून संन्यास घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. कणकवली येथील कार्यक्रमामध्ये त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. यापुढे कोणतीही राजकीय निवडणूक लढवणार नाही, आता फक्त पर्यावरणासाठी काम करण्याची इच्छा आहे, असे कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केलं आहे.(ex railway minister suresh prabhu leave from politics)
कणकवली येथील कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, “२०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढविली नव्हती, तशीच यापुढेही निवडणूक लढविणार नाही. गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होते आहेत. हवामानाचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देणार आहे”, असे त्यांनी या कार्यक्रमात सांगितले.
मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात सुरेश प्रभू यांनी रेल्वे, वाणिज्य(Commerce) ही खाती सांभाळली आहेत. सुरेश प्रभू हे व्यवसायाने सनदी लेखापाल आहेत. सुरेश प्रभू हे सुरवातीला शिवसेना पक्षात होते. २०१४ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात सुरेश प्रभू रेल्वे आणि वाणिज्य मंत्री होते.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही सुरेश प्रभू मंत्री होते. त्यावेळी पर्यावरण मंत्री असताना नद्या जोड प्रकल्पामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. कणकवली येथील कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील अनेक किस्से सांगितले. या कार्यक्रमात त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला
या कार्यक्रमात सुरेश प्रभू म्हणाले की, सीएचा व्यवसाय चांगला चालत असताना मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी, आपल्या या निर्णयाला घरातल्यांनी विरोध केला. परंतु, शिवसेना पक्ष प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आपण राजकारणात आलो आणि खासदार झालो, अशी आठवण सुरेश प्रभू यांनी सांगितली.
सुरेश प्रभू यांनी राजापूर मतदार संघातून लोकसभेसाठी सलग चारवेळा निवडणूक लढवली होती. गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे पर्यावरणाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी यापुढील आयुष्य खर्ची करणार, असे सुरेश प्रभू यांनी कणकवलीतील कार्यक्रमात सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
दारूड्या मुलाने जन्मदात्या आईवरच केला होता बलात्कार, न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा
काठी नं घोंगडं घेऊ द्या की रं, मला बी पालिकेत येऊ द्या की; राज ठाकरेंचा नवा लुक व्हायरल
‘सरकारचा हा क्रांतिकारक निर्णय’, केंद्राने घेतलेल्या महिलांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाचे कंगनाने केले स्वागत