गेल्या काही वर्षांत टाटा मोटर्सने भारतीय ग्राहकांसाठी आपल्या कारमध्ये विस्तृत सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. हेच कारण आहे की, ग्लोबल NCAP मध्ये जवळपास टाटा कंपनीच्या सर्व नवीन गाडयांना सुरक्षिततेसाठी ५ स्टार रेटिंग मिळू लागले आहे. टाटा हॅरियरपासून ते टाटा पंचपर्यंत सर्व कार सुरक्षिततेच्या दृष्टीने मजबूत आहेत.(indian-best-safe-car-tata-nexon-200-feet)
हिमाचल प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे टाटाच्या कार्स भारतीय निर्मित वाहनांमध्ये सर्वात सुरक्षित पर्यायांपैकी एक असल्याचं सिद्ध झालं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एका टाटा नेक्सॉन कारचा अपघात झाला. टाटा नेक्सॉन कार रस्त्यावरील बर्फावरून घसरल्याने तब्बल २०० फूट खोल दरीत कोसळली.
दरीत कोसळताना ही कार सुमारे ५ वेळा उलटली आणि झाडांमध्ये जाऊन अडकली. हा अपघात इतका भीषण होता की, या कारमध्ये बसलेले प्रवासी वाचणं जवळपास अशक्य होत. या अपघाताचा व्हिडिओ युट्यूबर निखिल राणा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे ही घटना समोर आली आहे. अपघाताची संपूर्ण माहिती एका स्थानिक व्यक्तीने युट्यूबर निखिल राणा यांना दिली होती.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी कारमध्ये दोघेजण होते. आश्चर्याची बाब म्हणजे या मोठ्या अपघातातून दोघेही सुखरूप बचावले आहेत, त्यांना एकही ओरखडा पडलेला नाही. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ही कार रस्त्यावर आणण्यात आली. या अपघातात कारलाही फारसे नुकसान झाले नाही. कारमध्ये दिल्या गेलेल्या सुरक्षा व्यवस्थेमुळे प्रवाशांचे प्राण वाचले.
Tata Nexon ही भारतातील पहिली कार आहे,ज्या कारला ग्लोबल NCAP ने ५ स्टारचे सेफ्टी रेटिंग दिले आहे. Tata Nexon कारला सुरक्षिततेसाठी १७ पैकी १६.७ गुण मिळाले आहेत. Tata Nexon ही कार सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. त्यामुळे Tata Nexon या कारची भारतातील सर्वात सुरक्षित मेड-इन-इंडिया कार म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
ABS फुल चॅनल वर्जन, ड्यूल स्टँडर्ड एयरबॅग आणि सीट बेल्ट रिमाइंडर अशा गोष्टींमुळे Tata Nexon या कारला ५ स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. ही अशी घडलेली काही पहिलीच घटना नाही. याआधीही टाटाच्या पंच मायक्रो एसयूव्ही कारचाही मोठा अपघात झाला होता. ज्यामध्ये टाटा पंच या कारचे मोठे नुकसान झाले होते. पण कारचे नुकसान होऊनही आत बसलेले प्रवासी सुरक्षित होते.
महत्वाच्या बातम्या :-
प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच…! ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक आऊट
जंगलात नेऊन शाळेतील विद्यार्थीनीवर केला सामूहिक बलात्कार, घराबाहेर सोडून गेले पळून
मोठी बातमी : भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका