तरुणीला नदीत मिळाली ९५ वर्षांपुर्वीची बॉटल; त्याच्यात असलेली चिठ्ठी वाचून तिला बसला धक्का

अनेक गोताखोर नदीत समुद्रात वेगवेगळ्या गोष्टी शोधण्यासाठी उड्या मारत असतात. पाण्याच्या तळाशी त्यांना अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी सापडत असतात. काही वेळा तर अशा गोष्टी सापडतात ज्याचा त्यांनी विचारही केलेला नसतो.

अशीच एक महिला गोताखोर असून तिचे नाव जेनिफर डॉकर असे आहे. ती नेहमीच नदीमध्ये, समुद्रामध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधत असते. जे तिच्या ग्राहकांना आवडेल. तिने आतापर्यंत अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बॉटल काढल्या आहे.

१८ जूनला डॉकरला एक हिरव्या कलरची छोटी बाटली भेटली आहे. त्यामध्ये तिला एक चिठ्ठी सुद्धा भेटली आहे. त्यामध्ये भेटलेल्या चिठ्ठीवर नोव्हेंबर १९२६ अशी तारीख लिहिलेली होती.

ही बॉटल कोणालाही भेटली, तर त्या व्यक्तीने यामधली चिठ्ठी जॉर्ज मोरो चेबॉयगन, मिशिगनला द्यावी आणि त्याला सांगावे कि ही चिठ्ठी तुम्हाला कुठे भेटली, असे त्या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आले होते. याचे फोटो डॉकरने तिच्या फेसबुक अकाऊंटवर टाकले आहे.

त्यानंतर काही दिवसांमध्ये डॉकरला वेगवेगळ्या लोकांचे मेसेज आलेले होते. तसेच सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहे. काही लोकांनी तर डॉकरने हे हटकून केले आहे, असेही म्हटले आहे. पण त्यावर डॉकरने प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे इतका रिकामा वेळ नाहीये, मी काही गोष्टी हटकून शेअर करु, असे डॉकरने म्हटले आहे.

त्यानंतर डॉकरला मिशेल प्राईमो नावाच्या महिलेचा एक फोन आला. त्यानंतर तिने त्या लेटरचे फोटो मागवले. त्यावेळी मिशेलच्या असे लक्षात आले की हे पत्र त्याचे वडिलांनी लिहिलेले आहे. कारण तिला तिच्या वडिलांचे हस्ताक्षर माहित होते.

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हे पत्र सापडले, त्या चेबॉयगन शहरात ती २० वर्षाची होईपर्यंत राहत होती. तसेच हे पत्र पण नोव्हेंबर महिन्यात फेकण्यात आले होते आणि तिचा जन्मही नोव्हेंबर महिन्यात झाला होता.

मिशेलच्या वडिलांचे १९९५ मध्ये निधन झाले होते. तिचे वडिल नेहमीच वेगवेगळे संदेश लिहायचे. जेव्हा मिशेल घराची साफसफाई करत होती, तेव्हाही तिला तिच्या वडिलांनी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली होती.

महत्वाच्या बातम्या-

आश्चर्यच! देश-परदेशातून या बटाट्यामध्ये राहायला येतात लोकं; एका दिवस राहण्याचे भाडे ऐकून बसेल धक्का
पैसे नसल्यामुळे पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन केला होता १० किलोमीटर प्रवास, त्याच्याच मुलीने केला ‘हा’ कारनामा
देशात कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही?, ICMR ने सांगितली खरी वस्तुस्थिती, जाणून घ्या..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.