मोठी बातमी! अदानींच्या मालकीच्या मुंद्रा बंदरावर सापडले तब्बल ९००० कोटींचे ड्रग्स

अफगाणिस्तानात तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथे ड्रग्जचा व्यापारही वाढला आहे. गुजरातच्या कच्छ येथील मुंद्रा बंदरातून हेरॉईनची मोठी खेप पकडण्यात आली आहे. या ड्रग्सची किंमत सुमारे 9000 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

दोन कंटेनरमध्ये सुमारे 3000 किलो हेरॉईन सापडले आहे. दोन लोकांना बेकायदेशीर ड्रग्जसह अटकही करण्यात आली आहे. हे बंदर प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीचे आहेत. या छापेमारीनंतर असा प्रश्न उपस्थित होत आहे की इतका मोठा ड्रग्सचा साठा आला कुठून?

हे बंदर गौतम अदानी यांच्या मालकीचे
मुंद्रा बंदराची मालकी अदानी पोर्टकडे आहे. अदानी पोर्ट ही उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीची कंपनी आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि सीमाशुल्क यांच्या कारवाईमध्ये हेरॉईन जप्त करण्यात आली आहे.

कस्टमने हेरॉईन जप्त केली आहे आणि या प्रकरणानंतर देशात खळबळ माजली आहे कारण याआधी इतकी मोठा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला नव्हता. सर्व यंत्रणा या ड्रग्सच्या तपासामध्ये लागल्या आहेत आणि आणखी कोणत्या ठिकाणी ड्रग्सचा सप्लाय केला जात आहे याचा तपास केला जात आहे.

हिरोइन टॅल्कम पावडर म्हणून आणले होते
तपास यंत्रणांच्या मते, एवढ्या मोठ्या प्रमाणात हेरॉईन ड्रग्ज येथे टॅल्कम पावडर म्हणून आणले गेले होते. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका कंपनीने हे हेरोईन टॅल्कम म्हणून आयात केले होते. विजयवाडा येथून आयात करणाऱ्या कंपनीने हा माल टॅल्कम पावडर असल्याचे सांगितले होते.

हे ड्रग्स हसन हुसेन लिमिटेडने अफगाणिस्तानच्या कंधार येथून निर्यात केले होते. डीआरआयने त्यांच्या नेटवर्कसह कंपनीसाठी छापे टाकणे सुरू केले आहे आणि आणखी ड्रग्स सापडण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.