भाजपच्या बड्या महीला नेत्याच्या गाडीतून ९० लाखांचे ड्रग्ज जप्त; राजकारणात खळबळ

पश्चिम बंगाल | भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पामेला गोस्वामी यांना पोलिसांनी लाखो रूपयांचं ड्रग्ज घेऊन जाताना अटक केली आहे. यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी भाजपवर टिका करत पामेला गोस्वामी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे

दोन वर्गमित्रांना ACB ने लाच घेताना केली अटक, एक होता उपजिल्हाधिकारी दुसरा गटविकास अधिकारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीपुर रोडवर वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका कारमध्ये भाजप युवा मोर्चाच्या पश्चिम बंगालच्या महासचिव पामेला गोस्वामी, मित्र प्रबीर कुमार आणि केंद्रीय सुरक्षा दलाचा जवान सोमनाथ तिघेजण एका कारमध्ये जाताना दिसले.

‘अब्दूल कलामांना मोदींनीच राष्ट्रपती केले; चंद्रकांत पाटलांनी उधळली मुक्ताफळे, वाचा..

कारची तपासणी केली असता कारमध्ये १०० ग्रॅम ड्रग्ज आढळून आलं. पोलिसांनी ते जप्त केलं आहे. बाजारात याची किंमत ९० लाख रूपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

भाजपाची रणरागिणी कडाडली; ‘संजय राठोडांची चौकशी होत नाही, तोपर्यंत…’

भाजप नेते लॉकेट चॅटर्जी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, पोलिसांनी विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून पामेला गोस्वामी यांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं आहे. या प्रकरणाची पक्षाने दखल घेतली असून लवकरचं सत्य समोर येईल.

पेट्रोलच्या वाढत्या दरापासून आता होईल सुटका, भारतात लॉन्च झाली इलेक्ट्रिक सायकल

कोण आहेत पामेला गोस्वामी

पामेला यांनी २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजप युवा मोर्चाच्या पश्चिम बंगालच्या महासचिव पदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. सोशल मिडियावर त्या नेहमी सक्रीय असतात. भाजपच्या कामांची माहिती त्या सोशल मिडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवत असतात.

 

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.