घाबरू नका! वय ८८, एचआरसीटी स्कोअर २५, मधुमेहाचा आजार; तरीही सहज बरे झाले आजोबा

नाशिक | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ग्रासले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचार सुरू असतानाच अनेकांनी प्राण गमावले आहेत.

कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर अनेक रुग्णांचा घाबरूनच मृत्यू झाला आहे. तर काहींनी न घाबरता कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. अशाच नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव येथील एका ८८ वर्षाच्या आजोबांनी चक्क एचआरसीटी स्कोर २५ असताना आणि मधुमेहाचा आजार असतानाही कोरोनाला हारवले आहे.

चांगदेवराव होळकर असं त्या ८८ वर्षाच्या कोरोना रुग्णाचं नाव आहे. ते लासलगाव येथील नाफेडचे माजी अध्यक्ष आहेत. फक्त रोगप्रतिकार शक्तीच्या जोरावर होळकर यांनी कोरोनावर मात केली आहे.

होळकर यांना १५ दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती.  त्यांच्या पत्नीची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. चांगदेवराव होळकर यांना डॉक्टरांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितलं.

होळकर यांची एचआरसीटी चाचणी केल्यानंतर स्कोअर ७ आला होता. त्यानंतर उपचार सुरू असताना पुन्हा एचआरसीटी चाचणी केली आणि त्यांचा स्कोअर २५ पैकी २५ आला. स्कोअर जास्त असूनही त्यांना कोणताही त्रास होत नव्हता.

त्यानंतर डॉक्टरांनी रेमडेसिवीर इंजेक्शन दिले तसेच व्हेंटिलेटर लागेल. अन् पुढील दोन दिवस जोखमीचे असल्याचंही  डॉक्टरांकडून सांगण्यात आले. मात्र कोरोनावरील खोकला, ताप, सर्दी याचा कोणताच त्रास नसल्याने चांगदेवराव होळकर यांनी घरी जाऊन विलगीकरणात राहण्याचं ठरवलं.

घरी आल्यानंतर केवळ रोगप्रतिकार शक्तीच्या जोरावर ८८ वर्षांच्या चांगदेवराव होळकर यांनी कोरोनाला न घाबरता मात केली आहे. त्यांची कोरोना चाचणी केल्यावर रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. होळकर यांच्यावर सध्या कौतूकांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान देशात कोरोनाने रौद्र रुप धारण केले आहे. दि. २२ रोजी ३ लाख ३२ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख ८६ हजार ९२० रुग्णांनी जीव गमावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरोना झालेल्या प्रसिद्ध पुजाऱ्याच्या मदतीला धावून आले असदुद्दीन औवेसी; केली मोठी मदत
ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यावर काय करावे, जाणून घ्या आरोग्य मंत्रालयांनी दिलीय महत्वाची माहिती
कोरोना झालाय.? घाबरू नका, १०५ वर्षीय आजोबाही झालेत बरे, फक्त या गोष्टींकडे लक्ष द्या
सलाम! कोरोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत मोफत रिक्षा प्रवास; पुण्यातील तरुणांचा उपक्रम

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.