मी जगलो, यांची मुलं अनाथ होतील; ८५ वर्षीय RSS स्वयंसेवकाने बेडचा त्याग करत दुसऱ्या रुग्णाला दिले जीवनदान

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णालयात अनेकांना बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्याने अनेक रुग्णांचा मृत्यु होत आहे.

असे असताना नागपुरमध्ये लोकांना आश्चर्याचा धक्का देणारा प्रकार घडला आहे. एका ८५ वर्षीय आजोबांनी तरुण व्यक्तीसाठी थेट आपल्या ऑक्सिजन बेडचा त्याग केला आहे, त्यानंतर पुढील तीनच दिवसांत त्या आजोबांनी मृत्युला कवटाळले आहे.

या आजोबांचे नाव नारायणराव दाभाडकर असे आहे. नागपुरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असणारे नारायण दाभाडकर यांना काही दिवसांपुर्वीच नागपुरचे एका खाजगी रुग्णालयात भरती केले होते.

त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती आणि ऑक्सिजन पातळी ६० वर आल्याने त्यांच्या मुलीने आणि जावयाने त्यांना इंदिरा गांधी शासकिय रुग्णालयात भरती केले होते. त्याठिकाणी एक महिला चाळीशीत असणाऱ्या पतीसाठी ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती.

त्या महिलेचे दु:ख नारायण दाभाडकर यांना पाहावले गेले नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:चा बेड त्या महिलेच्या नवऱ्याला देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कुटुंबाने या गोष्टीला खुप विरोध केला पण अखेर मोलाचे कार्य म्हणून नारायण दाभाडकर यांच्या निर्णयापुढे घरच्यांनाही झुकावे लागले.

मी जीवन जगलो आहे, या महिलेच्या पतीचा मृत्यु झाला तर त्यांची मुले अनाथ होतील, असे म्हणत त्यांनी आपला ऑक्सिजन बेड त्यांना देऊन टाकला. याबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ही ट्विट केले आहे. आजोबांच्या या कामांचे सगळीकडून कौतूक केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

खाकी वर्दीला सलाम! आईच्या मृतदेहाजवळ दोन उपाशी होते बाळ, पोलिसांनी भरविला मायेचा घास
भारतातील कोरोना परीस्थीतीवर बोलताना अक्षरश ढसाढसा रडली शिल्पा शेट्टी; म्हणाली…
पतीची तब्येत अचानक खालावली, डॉक्टर पत्नीने AC मधून ऑक्सिजन देत पतीचे प्राण वाचवले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.