८५% पेशंटना रेमडेसिवीरची गरज नसते पण तरीही डाॅक्टर वापरतात; एम्सच्या तज्ञांची धक्कादायक माहिती

देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रुग्णसंख्या वाढत असताना आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आता आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना बेड ऑक्सिजन देखील उपलब्ध होत नाहीत. यामुळे रुग्ण दगावत आहेत.

सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या इंजेक्शनासाठी अनेकांना वणवण फिरावे लागत आहे. मात्र एम्सचे संचालक डॉ. नरेश त्रेहान यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

ते म्हणाले, लोकांनी रेमडेसिवीर इंजेक्शनाला जादूची बुलेट मानू नये. रेमडेसिवीर हे औषध रामबाण औषध नाही. याची गरज असलेले रुग्ण फारच कमी आहेत. एक देश म्हणून आपण एकत्र काम केले तर ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची कमतरता भासणार नाही.

डॉक्टरांनी सांगितले की जे फक्त घाबरल्यामुळे त्यांना जास्त उपचार करावे लागतात. नाहीतर अनेकजण हे घरात उपचार केले तरी बरे होतात. कोरोना झालेल्यांना फार कमी जणांना रुग्णालयात दाखल करावे लागते.

बेड हे जबाबदारीने वापरले पाहिजेत, अनेकजण गरज नसतात हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. ते म्हणाले, प्रत्येक कोरोना रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नये. ते रामबाण औषध नाही, ते फक्त व्हायरल लोड कमी करते.

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, ८५ % कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर सारख्या विशिष्ट उपचारांची आवश्यक नसते. अनेकांना सर्दी, खोकला मात्र ते लगेच बरे होतात. केवळ १५ टक्के लोकांना हा संसर्ग वाढत जातो.

मात्र आपण बघत आलोय की, गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन बेड उपलब्ध होताना दिसत नाहीत, तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन देखील मिळत नाही. काही ठिकाणी गरज नसताना वापरले जात आहे, तर काही ठिकाणी गरज असताना उपलब्ध होत नाही.

ताज्या बातम्या

मोदी सरकारला उच्च न्यायालयाने झाप झाप झापले, भीक मागा, चोरी करा पण ऑक्सिजन द्या

आत्मनिर्भर महिला! या महिलांनी झेंडू फुलवून केली लाखोंची कमाई

जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या मुलाला तुरूंगातून पळवण्यासाठी आईने खोदले ३५ फूट लांबीचे भुयार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.