“मराठीला अभिजात दर्जा मिळावा हा प्रस्ताव केंद्रात पाठवून ८ वर्ष झाली, मोदींचा मंत्री खोटं बोलतोय”

अहमदनगर । गेल्या काही दिवसांपासून मराठीच्या अभिजात दर्जाच्या मुद्द्यावर राजकारण सुरू आहे. असे असताना आता ज्येष्ठ लेखक आणि मराठी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी मोदींवर टीका केली आहे. त्यांनी केलेली ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षित केली जात आहे.

याबाबत प्रस्ताव पाठवून ८ वर्षे झाली आहेत, मात्र सरकारकडून कोणतीही घोषणा केली जात नाही. मराठीच्या अभिजात दर्जाविषयी मोदी सरकारचा मंत्री सरळसरळ खोटं बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे आता तरी यावर निर्णय होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रंगनाथ पठारे म्हणाले, आम्ही केंद्र सरकारला याबाबत अभ्यास अहवाल आणि प्रस्ताव पाठवला. केंद्र सरकारने हा प्रस्ताव साहित्य अकादमीला पाठवला. याबाबत नामवंत भाषातज्ज्ञांची समिती नेमली. त्यांनी देखील हा मुद्दा योग्य असल्याचे सांगितले. मात्र तरी देखील यावर निर्णय होत नाही.

केंद्राकडे गेल्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचे सांगणे हे केवळ औपचारिकता होते. मोदी सरकारमधील हा मंत्री सरळसरळ खोटं बोलतो आहे. हे मंत्री संसदेत सांगतात की मराठी भाषेला आम्ही अभिजात भाषेचा दर्जा देण्यावर विचार करत आहोत.

मात्र तो प्रस्ताव साहित्य अकादमीला परत पाठवला आहे. आता केंद्र सरकार सांगत आहे की, दुसऱ्या एखाद्या भाषेचा प्रस्ताव आला, तर त्याच्यासोबत मराठीचा प्रस्ताव आमच्याकडे पाठवा, असेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे हा विषय लांबवला जात आहे.

रंगनाथ पठारे म्हणाले, “कर्नाटकातील मराठी लोकांना मराठीला लिपी असते हेच माहिती नाही. आता महाराष्ट्र देशभर पसरला आहे. मराठी माध्यमाची कॉलेजेस ग्वालियर, इंदोर, बडोदामध्ये होती. कराचीत मराठी पाठशाळा होती. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर कर्नाटकातील मराठी, हरियाणातील रोड मराठा यांच्यासाठी काम करता येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

रवी शास्त्री, विराट कोहलीवर बीसीसीआय नाराज, कारवाई होण्याची शक्यता, काय आहे प्रकरण, वाचा..

इंग्लड विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताच्या ‘या’ चार खेळाडूंनी केले जबरदस्त प्रदर्शन; त्यांच्यामुळेच इंग्लंडचा झाला पराभव

पुनर्विवाहानंतरही विधवेला पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.