८ वर्षांच्या तुलसीला १२ आंब्याचे मिळाले १ लाख २० हजार रुपये, सोबत मिळाला १ मोबाईल आणि २ वर्षांचे इंटरनेट फ्री

जमशेदपुर। काही दिवसांपूर्वी एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अभ्यासासाठी ८ वर्षाची तुलसी नावाची चिमुरडी गरिबीशी संघर्ष करत होती. घराची परिस्थिती गरिबीची असल्याने तुलसी ऑनलाईन अभ्यासाठी मोबाईल हवा यासाठी किनन स्टेडिअमच्या समोर आंबे विकण्याचं काम करत होती. मात्र ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच तुलसीला मदत मिळाली आहे.

माहिती मिळताच व्हॅल्यूएबल एड्युटेनमेंट कंपनीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र हेटे हे तुलशीच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. कंपनीचे संचालक नरेंद्र हेटे आणि त्याचा मुलगा अमेय हेटे यांनी तुळशीला मदत केली आहे. अमेय हेटे यांनी तुलसी कडील खरेदीसाठी असणारे १२ आंबे १ लाख २० हजाराला खरेदी केले आहेत.

इतकेच नाही तर तुलसीला त्यांनी मोबाईल फोन आणि दोन वर्षाचं इंटरनेट सेवा फ्री दिली आहे. जेणेकरून तुलसी ऑनलाइन अभ्यास करू शकेल व तिला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. या दोघांनी तुलसीला मदत केल्याने ते दोघेही खूप खुश आहेत.

मात्र यानंतर आता मदत मिळाल्याने तुलसीचे आईवडीलही खूप खुश आहेत. नरेंद्र हेटे आणि त्याचा मुलगा अमेय हेटे हे तुलसीसाठी देवासारखे धावून आल्याने त्या दोघांनाही त्यांचे आभार मानले आहेत. त्यानंतर आता तुलसी देखील प्रचंड खुश आहे. व आता तिची शिकण्याची इच्छाही पूर्ण होणार आहे.

काही दिवसांपूर्वी तुलसी म्हणाली होती की, वडिलांची नोकरी सुटल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तिला आंबे विकावे लागत आहे. आंबे विकून तिला अन्ड्रॉइड फोन खरेदी करायचा आहे. त्यामुळे ती अभ्यास करू शकेल. मात्र तिची आता ही समस्या दूर झाली आहे.

महत्वाच्या बातम्या
करिश्मा कपूरचा चित्रपट पाहील्यामूळे तिच्या चाहत्याला मिळाली होती शिक्षा; रात्रभर बाहेर झोपावे लागले
१.९ मिलियन फॉलोअर्स, शिवमुद्रा तोंडपाठ, शेगावच्या चिमुकलीचे होतेय देशात कौतुक…
४ वाघांनी घेरले पण एकाच्याही तावडीत नाही सापडला हा बदक, पाहा विडिओ 
‘माझ्याशिवाय आणीबाणी कोणालाच कळणार नाही’, म्हणत कंगनाने दिग्दर्शकाला दाखवला थेट बाहेरचा रस्ता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.