खतरनाक! घरात घुसली ८ फुटांची मगर, मगरीला पाहून घरातील कुटुंबियांची उडाली तारांबळ, पहा व्हिडिओ

जयपूर । सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे थरारक असतात. तर काही व्हिडिओ हे प्रेरणा देणारे असतात. तर काही लहान मुलांचे क्युट व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर काही प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.

असाच एक मगरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मगरीचे नाव ऐकले तर कित्येकांच्या अंगावर काटा येतो. अशात अचानक मगर तुमच्या घरात घुसली तर?, अशीच एक घटना नुकतीच राजस्थानच्या सवाई माधोपुर येथे घडली आहे.

इथे एका कुटुंबाच्या घरात थेट आठ फूट लांब मगरीने एन्ट्री केली. हे पाहून घरातील लोकांची धांदल उडाली. घरात मगर शिरल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना पाहून परिसरात खळबळ उडाली, यानंतर वनविभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मगर एकदम आरामत फिरताना दिसत आहे. मात्र, तिला पकडण्यासाठी मगरीवर दोरी टाकली जाते, तेव्हा ती वेगानं फिरू लागते. आसपास उभा असलेले लोक ही संपूर्ण घटना पाहत आहेत. मात्र, मगर जोराने फिरू लागताच हे सर्व तिथून पळ काढतात.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मगर एकदम आरामात फिरत आहे. जसं की हे तिचंच घर आहे. तर, ज्यांच्या घरात मगर शिरली आहे, ते मात्र स्वतःचा बचाव करण्यासाठी छतावर जाऊन उभा राहिले आहेत. चांगली गोष्ट ही आहे, की वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचायला जास्त वेळ लावला नाही.

यामुळे मगरीला किंवा कोणत्या व्यक्तीलाही कसल्याही प्रकारची इजा झाली नाही. वनविभागालाही या मगरीला पकडण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले, अनेक तासाच्या प्रयत्नांनंतर या मगरीला पकडण्यात यश आले. या व्हिडिओला अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत.

ताज्या बातम्या

बुलेटवर मांडीवर बसून जोडप्याचे चालू होते अश्लील चाळे, गावकऱ्यांनी अडवून चांगलीच जिरवली, पहा व्हिडीओ

धक्कादायक! जोधा अकबर फेम अभिनेत्याला झाला ‘हा’ गंभीर आजार; जीव वाचवण्यासाठी कापावा लागला पाय

लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलाने केला ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार, पैसेही उकळले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.