आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंसोबत झाली 8 कोटींची डील? व्हिडिओमुळे सर्वत्र खळबळ

मुंबई। आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील 8 कोटी रुपये वानखेडेंना देण्यात येणार होते आणि बाकीचे वाटून घेण्यात येणार होते, असा दावा करत एनसीबीच्या पंचानेच समीर वानखेडेंसह एनसीबीवर बॉम्ब टाकला आहे.

व आता सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेता शाहरुख खानच मुलगा आर्यन खानचं ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाल्याचा धक्कादायक खुलासा करणारा व्हिडीओ समोर आला आहे. के.पी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने हा व्हिडीओ व्हायरल करून प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाली होती आणि त्यातले 8 कोटी वानखेडेंना दिले जाणार होते असा गंभीर आरोप प्रभाकर साईलने केला आहे.

त्यामुळे आता या प्रकरणात अधिकाधिक गुंता वाढत चालला आहे. आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यामध्ये त्याने असं सांगितलं आहे की, केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका.

18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साळी यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे. गोसावी आणि सॅम यांनी समीर वानखेडेंशी 18 कोटी आणि 8 कोटींची चर्चा केली होती.

क्रुझवर छापेमारी झाल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावी तसेच सॅमला निळ्या रंगाच्या मर्सिडीजमध्ये पाहिले होते. या तिघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली होती, असा दावाही त्यांनी केला आहे पुढे प्रभाकर म्हणाला आहे की,त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितलं.

एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली.गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.

तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असंही प्रभाकर साईलनी सांगितलं. सध्या गोसावी फरार असून माझ्या जीवाला धोका असल्याचं देखील प्रभाकरने सांगितलं आहे. खळबळजनक म्हणजे त्याच्या जीवाला समीर वानखेडेकडून धोका असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.