वयाच्या ७३ व्या वर्षी राखी गुलजार करतात ‘हे’ काम, त्यांना ओळखणेही झाले कठीण….

मुंबई । बॉलिवूडमधील ७० च्या दशकात अनेक अभिनेते आणि अभिनेत्री होत्या, त्यावेळी त्यांना त्यांच्या चाहत्यांकडून प्रेम देखील भेटायचे आता ते नसतील तरी त्यांच्या चाहत्यांच्या मनावर ते राज करत असतात. ७० च्या दशाकतील चित्रपट आता देखील मोठ्या प्रमाणात बघितले जातात.

अनेक सूंदर अभिनेत्री त्यावेळी होत्या आणि त्याच सूंदर अभिनेत्री पैकी एक राखी गुलजार होत्या ज्यांनी आपल्या सौंदर्यासोबत आपल्या अदाकारीनेही रसिकांची मने जिंकली आहेत. राखी आतांब ७३ वर्षांच्या झाले आहेत, काळानुसार त्यांच्यात झालेला बदल पाहून त्यांना ओळखणेही कठीण झाले आहे. राखी आता काय करतात ते आपण जाणून घेऊयात.

राखी आता त्यांच्या फार्म हाऊसमध्ये राहतात. त्यांचे फार्म हाऊस पनवेलमध्ये आहे. मुंबई ही त्यांना नकोशी झाली होती, मायानगरीचा कंटाळा आला होता म्हणून पनवेलच्या फार्महाऊसमध्ये त्या स्थायिक झाल्या. तिथेच शेती करण्यात त्या बिझी झाल्या. निसर्गाच्या सानिध्यात राहणेच त्यांना जास्त आवडते त्यामुळे पनवेलमध्येच राहणे त्या जास्त पसंत करतात.

पनवेलमधल्या फार्महाऊसमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्यात राखी बिझी राहतात. त्या शेतीही करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळांची त्यांनी त्यांच्या शेतात लागवडही केली आहे. राखी यांना एक मुलगी आहे मेघना गुलजार असे तिचे नाव असून मेघनाने देखील सिनेसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

राखी गुलजार झगमगाटाच्या दुनियेपासून दूर जात साधे पद्धतीने जीवन जगत आहेत. पहिल्या चित्रपटातूनच राखी यांना प्रचंड यश मिळाले. राखी यांनी त्यांच्या सिनेकारकीर्दीत बर्‍याच चित्रपटांत काम केले आहे. मुख्य नायिकेपासून ती अनेक चित्रपटांमध्ये आई आणि आजीच्या भूमिकेतही झळकल्या आहेत.

ताज्या बातम्या

बॉयफ्रेंडचे निघाले आणखी तीन मुलींसोबत अफेअर; तरुणीने ‘असा’ घेतला बॉयफ्रेंडशी बदला

मुस्लिम मुलीच्या प्रेमात होता हिंदू तरुण मात्र विरोध असल्याने उचललं असं पाऊल की…

बाप माणूस! रक्ताचे नाते नसतानाही स्वीकारले १५ अंध मुलांचे पितृत्व, वाचा सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.