७२ तासात माफी मागा अन्यथा १०० कोटींचा दावा ठोकणार; अनिल परबांकडून सोमय्यांना अल्टिमेटम

काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या महाविकास आघाडीच्या मंत्री आणि नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याच्या मालिका सुरूच आहेत. किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर काही गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

या आरोपानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मानहानीचा दावा करणारी नोटीस किरीट सोमय्या यांना वकिलामार्फत पाठवली होती. ७२ तासांच्या आत माफी मागा नाहीतर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला जाईल.

याप्रकरणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा कोर्टात दाखल केला आहे. मंगळवारी परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात हा दावा दाखल केला आहे. अनिल परब यांनी ट्टिटद्वारे ही माहिती दिली.

यामुळे किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी आणि मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन ७२ तासांत माफी मागण्याचे सूचित केले होते.

परंतु त्यांनी माफी मागितली नसल्याने मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे असे मंत्री परब यांनी सांगितले.

या नोटीस मध्ये किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या विरोधात जी जी ट्विट केली आहेत. या सर्वांचा उल्लेख या नोटीस मध्ये आहे. १० जून २०२१ ला सोमय्या यांनी अनिल परब यांचा घोटाळा अस ट्विट केलं होत. आणि नवी दिल्लीत ED आणि इतर विभागाकडे तक्रार दाखल करण्याचे म्हटले होते.

दापोलीमधील साई आणि सी क्रौंच अशी दोन अनधिकृत रिसोर्ट असल्याचा आरोप केला आहे. त्याचसोबत परब यांचं वांद्रे येथील म्हाडा कॉलनीतील कार्यालय अनधिकृतपणे बांधले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या
कर्जबाजारी रिक्षाचालकाचे नशीब फळफळले! रात्रीत झाला तब्बल १२ कोटींचा मालक; जाणून घ्या…
शिवसेनेच्या मुखपत्रातूनच संजय राऊतांवर जोरदार टीका; तुम्ही पक्षाला ‘ना घर का ना घाट का’ करून ठेवले..
उठा उठा दिवाळी आली मोती साबणाची वेळ झाली म्हणाणाऱ्या आजोबांचे निधन, वयाच्या ९६ व्यावर्षी घेतला अखेरचा श्वास
“संजय राऊत उद्धव ठाकरेंकडून पगार घेतात की शरद पवारांकडून, हे तरी त्यांनी सिद्ध करावं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.