७० आणि ८० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा राजू आज असे आयुष्य जगतो

बॉलीवूड चित्रपटांमध्ये अनेक बालकलाकारांनी काम केले आहे. पण त्यातले काही बालकलाकार मात्र खुप प्रसिद्ध झाले होते. अशाच एका कलाकाराबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हा बालकलाकार ७० च्या दशकात खुप प्रसिद्ध होता.

या बालकलाराचे नाव आहे मास्टर राजू. ७० च्या दशकात मास्टर राजूने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलीवूडच्या मोठ्या कलाकारांसोबत राजू देखील प्रसिद्ध होता. त्यानंतर त्याने टेलिव्हिजनवर देखील अनेक वर्षे काम केले आहे.

मास्टर राजूचे खरे नाव फहीन आझानी होते. पण त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी त्यांचे नाव बदलून मास्टर राजू करण्यात आले होते. ‘परिचय’ चित्रपटाच्या वेळी संजीव कुमारने त्याचे नाव बदलले होते. त्यानंतर तो मास्टर राजू याच नावाने प्रसिद्ध झाला.

राजुचा जन्म मुंबईच्या डोंगरी भागात झाला होता. त्याच्या कुटुंबाचे अभिनय क्षेत्राशी काहीही नाते नव्हते. पण तरीही वयाच्या पाचव्या वर्षी राजूने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

परिचय चित्रपटासाठी गुलझारला एका नवीन चेहऱ्याची गरज होती. म्हणून त्यांनी राजूची निवड केली. पहिल्याच चित्रपटामध्ये राजूने संजीव कुमार, जितेंद्र, जया बच्चन आणि प्राणसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले. त्यामुळे त्याला खुप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली.

पहिलाच चित्रपट हिट झाल्यामुळे राजूकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. त्यानंतर त्याने आराधना, अमर प्रेम, दाग, अभिमान, चिचोर, खट्टा मिट्टा यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. राजूने बालकलाकार म्हणून शंभर पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

प्रत्येक चित्रपटासोबत राजूची प्रसिद्धी देखील मोठ्या प्रमाणावर वाढत होती. कमी वयात अतिशय उत्तम अभिनय राजू करत होता. म्हणून चिचोर चित्रपटासाठी राजूला सर्वोत्तम बालकलाकारच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

राजूने बॉलीवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. म्हणून त्याला अभिनयाची उत्तम जाण झाली. अनेक मोठे कलाकार निर्माते राजुसोबत काम करायला तयार असायचे. पण काही वर्षांनी राजूने शिक्षणासाठी अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला होता.

त्यानंतर ९० च्या दशकात राजूने परत बॉलीवूडमध्ये कमबॅक केला. अफसाना प्यार का, साजन चले ससुराल, सतरंज, खुदार अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले. पण काही काळाने राजूला चित्रपटांच्या ऑफर येणे बंद झाले.

म्हणून राजूने टेलिव्हिजनवर काम करायला सुरुवात केली. ‘चुनौती’ ही राजूची पहिली मालिका होती. त्यानंतर बडी देवराणी, अदालत, महाराणा प्रताप, सीआयडी यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. त्याला तेव्हा प्रसिद्धी देखील मिळाली.

आज अनेक नवीन अभिनेते आले आहेत. म्हणून राजूला जास्त काम मिळत नाही. अनेकदा तो काम मागत असतात. पण त्यालस कोणीही कामाची ऑफर देत नाही. म्हणून तो चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये दिसत नाही. आज राजू अभिनय क्षेत्रापासून लांब आहे.

७० च्या दशकात जो बालकलाकार प्रसिद्ध होता. आज त्या कलाकाराला बॉलीवूडमध्ये काम मागावे लागत आहे. या कारणामुळे राजूने अभिनय क्षेत्रापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना कामाची ऑफर आली तर ते काम करतात. त्याने ठिकाणी पैसे गुंतवले आहेत. म्हणून आज तो त्याच्या कुटुंबासोबत चांगले आयुष्य जगत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बाॅलीवूडमध्ये काम करण्यासाठी इरेला पेटलेल्या दिशाने शिक्षण अर्ध्यावर सोडलं होतं; वाचा पुर्ण किस्सा..

साधेपणामूळे प्रसिद्ध आहे साऊथची ‘ही’ सुंदर अभिनेत्री; बोल्ड सीन्सला देते नकार

स्वतः च्या वडीलांमूळे पुजा भट्टचे करिअर फ्लॉप झाले होते?

रेखाने विनोद मेहरासोबत गुपचूप लग्न केले होते का? वाचा खरं काय..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.